शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदारांचा समावेश असलेल्या यादीनुसार होणार निवडणूक? आयोग, नगरपालिकेत समन्वयाचा अभाव : काँग्रेसची प्रशासनावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:54 IST

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीच्या विधानसभा निवडणुकीवे‌‌ळी तयार केलेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र ...

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीच्या विधानसभा निवडणुकीवे‌‌ळी तयार केलेली मतदारयादी ग्राह्य धरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या मतदारयादीत जी बोगस नावे होती, ती काढून टाकण्यासाठी ज्या हरकती मतदार नोंदणी कार्यक्रमादरम्यान घेण्यात आल्या होत्या, त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. बोगस नावे काढून टाकल्याखेरीज यादी ग्राह्य मानण्यास विरोध होत आहे.

अंबरनाथ नगरपरिषदेसाठी विधानसभेची १५ जानेवारी २०२१ रोजी जी मतदारयादी तयार करण्यात आली त्या मतदार यादीनुसार निवडणुकीचे काम सुरू करण्यात आले. मात्र त्या यादीतील बोगस नावांसंदर्भात काँग्रेसच्या उमेदवारांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्या हरकतींवर तहसीलदार कार्यालयात सुनावणी घेण्यात आली होती. बोगस नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात आली. काँग्रेसचे उमेश पाटील आणि किरण राठोड यांनी याप्रकरणी हरकत घेतली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे ही कार्यवाही करण्यात आली. मात्र आयोग व नगरपालिका या दोन शासकीय कार्यालयांमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावाचा फटका उमेदवारांना बसला. मतदार यादीमधील बोगस नावे उघड झालेली असताना आणि ती वगळण्याचे आदेश असतानाही ती वगळण्याबाबत विलंब केला जात आहे. पालिका प्रशासन ती बोगस नावे मतदारयादीत समाविष्ट असताना त्याआधारे निवडणूक घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. यासंदर्भात राठोड आणि पाटील यांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र आयोगाचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.

.............

‘‘ आयोगाकडून आम्हाला १५ जानेवारीच्या यादीनुसार काम करण्याचे आदेश आले आहेत. ती यादी घेऊन आम्ही काम सुरू केले आहे. त्यानंतर काही नावे वगळण्याचे आदेश आले असतील, तर त्यासंदर्भात आम्हाला आयोगाकडून आदेश येणे गरजचे आहे. आम्हाला आदेश आल्यावरच आम्ही पुढील कार्यवाही करू.

-डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी. अंबरनाथ नगरपरिषद

..............

वाचली