शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोणाच्याही घराची वीज कापलीत तर...; विजेच्या वाढत्या बिलांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 11:36 IST

ठाण्यात वाढत्या वीज बिलांविरोधात मनसे आक्रमक

ठाणे: कोरोना संकट आणि त्यामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. त्यातच वीज कंपन्या अव्वाच्या सव्वा बिलं पाठवत असल्यानं सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. याविरोधात आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोणाच्याही घरातील वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसोबत सरकारी कार्यालयांमधील वीज कापू, असा इशारा मनसेचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. कोरोनामुळे आधीच नागरिक त्रस्त आहेत. त्यात आता त्यांना वाढीव वीज बिलं पाठवून आणखी मनस्ताप देण्यात येत असल्याचं जाधव म्हणाले. 'ठाण्याच्या हिरानंदनी भागातील एका महिलेला आधी हजार रुपये बिल यायचं. आता ते थेट २० हजारांवर गेलं आहे. त्या महिलेची तक्रार ऐकून घेण्यासाठी गेलो असता, तिथे आणखी १०० माणसं भेटली. त्यांचीदेखीस तिच तक्रार होती. आधी ज्यांना २ हजार रुपये बिल यायचं, त्यांना आता २० हजारांचं बिल पाठवण्यात येत आहे,' असं जाधव म्हणाले.'सध्या कोरोनामुळे अनेकजण घरीच थांबले आहेत. त्यामुळे २ हजार रुपये येणारं वीज बिल तीन-साडे तीन हजार आल्यास समजू शकतो. पण ते थेट २० हजार कसं काय येतं?,' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे सरकारनं घर मालकांना, दुकान मालकांना भाडं वसूल न करण्याचं आवाहन केलं. अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मग आता सरकारनं गेल्या तीन महिन्यांचं वीज बिल माफ करावं, अशी मागणी जाधव यांनी केली. ठाण्यात कोणाचीही वीज कापली गेल्यास मनसे एमएससीबीसह सरकारी कार्यालयांची वीज कापेल, असा इशारा जाधव यांनी दिला आहे. आधीच अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. अनेकांना पगार मिळालेले नाहीत. काहींना बिनपगारी सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. अशा व्यक्तींनी वीज बिलं कशी भरायची, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सध्या लोकांना कोरोनापेक्षा वीज बिलाची भीती वाटू लागली असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाelectricityवीज