शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात जंगली मगरीची तस्करी करणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 23:57 IST

ठाण्यात कोकोडीयस पॅलेस्ट्रीयस अर्थात जंगली मगरीच्या पिल्लांची तस्करी करणाºया साकलेन सिराजउद्दीन खातीब (२८, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली.

ठळक मुद्देमगरीच्या सात पिल्लांची सुखरुप सुटका खंडणी विरोधी पथकाची कारवाई:

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यात कोकोडीयस पॅलेस्ट्रीयस अर्थात जंगली मगरीच्या पिल्लांची तस्करी करणाºया साकलेन सिराजउद्दीन खातीब (२८, रा. कौसा, मुंब्रा, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणी विरोधी पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून मगरीची सात पिल्ले जप्त केली आहेत.मुंब्रा रेतीबंदर रस्त्यावर एक व्यक्ती जंगली मगरीची पिल्ले बेकायदेशीरपणे बाळगून तस्करीसाठी येणार असल्याची टीप ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार रोशन जाधव यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल, परिक्षेत्र वन अधिकारी यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक पोपट नाले, जमादार संजय भिवणकर, पोलीस हवालदार नितीन ओवळेकर आणि पोलीस नाईक हेमंत महाले आदींच्या पथकाने १० जुलै २०२१ रोजी कौसा भागात सापळा रचून साकलेन याला अटक केली. त्याच्या तावडीतून दोन लाख ८६ हजारांच्या सात जिवंत मगरीच्या पिल्लांचीही सुटका केली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ९, ३९ तसेच ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकलेन याला ठाणे न्यायालयाने १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी