शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पतीशी अनैतिक संबंधामुळे पत्नीकडून महिलेची हत्या; नव्या घरातच घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 11:43 IST

लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती.

ठाणे: पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गीता यादव (३६) या महिलेने मनीषा पांडे (३०) हिच्या अंगावर उकळते तूप ओतून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकमान्यनगर भागात हा प्रकार घडला होता. उपचारादरम्यान ६ मार्च रोजी मनीषाचा मृत्यू झाल्याने तिची आई मीरा खिरदेकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल केला.  

लोकमान्यनगर भागात मनीषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती. तर ज्ञानेश्वरनगर भागात गीता वास्तव्याला आहे. पतीचे मनीषासोबत अनैतिक संबंध असल्याचा गीताला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होते. मनीषा ही कामानिमित्ताने २३ जानेवारी २०२२ रोजी तिच्या माहेरी गेली होती. त्याचवेळी अचानक गीताने मनीषाला जेवण बनविण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे मनीषा तिच्या लोकमान्यनगर येथील घरी पोहचली. 

घरात जेवण बनवित असताना गीताने उकळते तूप तिच्या अंगावर ओतले. यात ती गंभीर जखमी झाली. तिला लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गीताला अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले. 

नव्या घरातच घडली घटना-

पतीशी वाद झाल्याने गीता ही तिच्या माहेरी वास्तव्याला होती. या घटनेच्या आठ दिवस आधीच लोकमान्यनगर येथे तिने स्वतंत्रपणे भाड्याने खोली घेतली होती. त्याच घरात हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळthaneठाणे