शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहीद मेजर कौस्तुभ राणेंच्या पत्नी कनिका सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2020 23:36 IST

वीरपत्नीच्या देशसेवेची तळमळ आणि त्यागाबद्दल नागरिकांमधून अभिमान व्यक्त

मीरारोड -  मीरारोडचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका राणे भारतीय सैन्यदलात शनिवारी लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या आहे . पतीच्या निधना नंतर कनिका ह्यांनी सैन्य दलात रुजू होऊन देशसेवेचे व्रत पुढे कायम ठेवण्याचा निर्धार केला होता. या वीरपत्नीच्या देशसेवेची तळमळ आणि त्यागाबद्दल नागरिकांमधून अभिमान व्यक्त होत आहे.  

मीरारोडच्या शीतल नगरमध्ये राहणारे मेजर कौस्तुभ राणे ऑगस्ट २०१८ मध्ये पाकिस्तान सीमेवर काश्मीरच्या गुरेझ सेक्टर भागात दहशतवाद्यांशी लढताना शहिद झाले होते. त्यावेळी मेजर कौस्तुभ यांचे वडील प्रकाशकुमार, आई ज्योती, पत्नी कनिका, बहीण कार्तिकी यांनी साश्रू नयनांनी पण मोठ्या अभिमानाने कौस्तुभला निरोप दिला होता. गेल्या वर्षी ३ वर्षांचा मुलगा अगस्त्य लहान असून देखील कनिका ह्यांनी सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये ११ महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती. 

माझ्या मुलाने मला सैनिकाच्या गणवेशात बघावं. मी देशासाठी काय करतो, हे माझ्या मुलाला कळावे, असे कौस्तुभ यांना वाटायचं. आता ते नाहीत. पण मी ही माझ्या मुलाला सैन्य दलाच्या गणवेशात दिसेल, तेव्हा त्याला कळेल, आपला बाबा काय होता, आपली आईही देशासाठी काही तरी करते आहे, हे त्याला समजेल अश्या भावना त्यावेळी कनिका राणे यांनी व्यक्त केल्या होत्या . ११ महिन्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून कनिका ह्या आता सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्त झाल्या आहेत . 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान