शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला रिव्हॉल्व्हरने मारहाण; पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 01:00 IST

प्रियंका (३६) आणि भान हे दोघेही ठाण्यातील एकाच कंपनीत नोकरीला असल्यामुळे त्यांचा २००८ मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता.

ठाणे: पहिल्या लग्नाचा घटस्फोट झालेला नसतानाही दुसऱ्या मुलीशी अनैतिक संबंध ठेवल्याचा जाब विचारणाºया पत्नीलाच चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करुन रिव्हॉल्व्हरने गोळी घालण्याची धमकी देणाºया भान चंद (३६) या पतीला कासारवडवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्याला १७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

प्रियंका (३६) आणि भान हे दोघेही ठाण्यातील एकाच कंपनीत नोकरीला असल्यामुळे त्यांचा २००८ मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. तो मूळचा गढवाल, उत्तराखंडचा, तर ती खेड, रत्नागिरी येथील रहिवासी आहे. त्यांना दहा आणि पाच वर्षांची दोन मुलेही आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो तिच्याशी क्षुल्लक कारणावरुन भांडण करीत होता. पण ती त्याकडे दुर्लक्ष करीत होती. अलिकडे त्याचे पुन्हा त्याच्याच कंपनीतील त्याच्याच जातीच्या अन्य एका तरुणीशी प्रेमसंबंध सुरु असल्याची कुणकुण तिला लागली. त्याबाबत तिने विचारणा केल्यावर त्याने ‘मैने शादी किया है उनसे’ असे म्हणत तिलाच शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. ५ जून २०१९ रोजी ती अंधेरी येथील तिच्या माहेरी मुलांसह निघून गेली. तरीही त्याने बघून घेण्याची धमकी देत तिला पुन्हा येण्यास बजावले. १२ जून रोजी ती पुन्हा ठाण्यातील घोडबंदर रोड येथील पतीच्या घरी गेली. तेव्हा त्यांच्यात अनैतिक संबंधावरुन पुन्हा वाद झाला. या वादातूनच त्याने चामडी पट्ट्याने तिला पाठीवर, हातावर जबर मारहाण केली. तिने प्रतिकार केल्यानंतर त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर तिच्या कानाजवळ लावून ठार मारण्याची धमकीही त्याने दिली. त्यानंतर रिव्हॉल्व्हरच्या मागील दस्त्याने तिच्या डोळ्याच्या मागील बाजूला जखमी केले.या सर्व प्रकाराला कंटाळून तिने अखेर याप्रकरणी १३ जून रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी