शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

पत्नीचे तुकडे करणा-या पतीला अटक, मुंब्रा पोलिसांची कामगिरी; मुलीवरही केले अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 02:42 IST

चार वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात शिर आणि पाय नसलेले केवळ धड पोलिसांना मिळाले होते. याच खूनप्रकरणी त्याच महिलेच्या पतीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे.

जितेंद्र कालेकर ठाणे : चार वर्षांपूर्वी मुंब्रा परिसरात शिर आणि पाय नसलेले केवळ धड पोलिसांना मिळाले होते. याच खूनप्रकरणी त्याच महिलेच्या पतीला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य या आरोपीने केल्याचे तपासातून समोर आले असून, गेल्या पाच वर्षांपासून तो आपल्याच मुलीवरही लैंगिक अत्याचार करीत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला सुरुवातीला बलात्कार प्रकरणात अटक केली आहे.मुंब्य्रातील, कौसा भागातील शिवाजीनगर येथे राहणाºया महंमद अब्दुल्ला तजमुल शेख ऊर्फ बिरेंद्र सहा (५०, मुुळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे.२२ सप्टेंबर २०१४ रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास मुंब्रा बायपास, गीते कंपाऊंडजवळ एका प्लास्टीकच्या गोणीमध्ये एका महिलेचा शीर आणि पाय नसलेला देह मुंब्रा पोलिसांना मिळाला होता. तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास मुंढे यांनी या प्रकरणाचा तपास न लागल्यामुळे डीएनए अहवाल मुंबईतील न्यावैद्यक प्रयोगशाळेत राखून ठेवला होता. ज्या दिवशी हा अर्धवट मृतदेह पोलिसांना मिळाला होता, तेव्हापासून शिवाजीनगर भागातील एक महिला बेपत्ता आहे. मात्र, ती हरविल्याची कोणतीही तक्रार तिचा पती अब्दुल्ला याने दाखल केली नसल्याची माहिती एका खास खबºयाने सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे यांना दिली. तिच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली बोरसे यांच्यासह हवालदार सुनील गिरे, सुदाम पिसे आणि दत्ता गायकवाड आदींच्या पथकाने अब्दुल्ला याला १५ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी ‘बोलते’ करण्याचे प्रयत्न केल्यानंतरही तो उडवाउडवीचीच उत्तरे देत होता.त्याच्या पहिल्या पत्नीलाही याच प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर मात्र तिने धक्कादायक माहिती दिली. त्याने एकूण चार विवाह केले असून तिच्याच १३ वर्षांच्या मुलीवर तो गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत होता. धार्मिक ग्रंथाचा आधार देऊन तो असे करणे म्हणजे चांगले कर्म केल्यासारखे असल्याचे तो मुलीला आणि पत्नीला भासवित होता. तर पत्नीला ठार मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार करीत होता.आता आपले कोणीही काहीही करु शकणार नाही, याच अविर्भावात असतानाच मुंब्रा पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.जास्त विवाह करण्यासाठी त्याने केले होते धर्मांतर -मुस्लीम धर्म स्वीकारल्यानंतर आपल्याला एकापेक्षा अनेक विवाह करता येतील, हा समज असल्यामुळे मूळच्या बिरेंद्र सहा याने १६ वर्षांपूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारला. पहिली पत्नी आवडत नसल्यामुळे त्याने दुसरा आणि कालांतराने तिसराही विवाह केला. दुसºया आणि तिसºया पत्नीला त्याने अल्पावधीतच ‘तलाक’ दिला.आता आपण अगदी मनासारखे करू शकतो, असा समज झाल्यानेच तबस्सूम या तरुणीशी त्याने चौथा निकाह केला. सुरुवातीचे काही दिवस बरे गेल्यानंतर तिच्याही चारित्र्यावर तो संशय घेऊ लागला. याच संशयातून त्याने तिची एका खंजीराने अत्यंत निर्घृणपणे हत्या करून शिर धडावेगळे करून एका प्लास्टीकच्या गोणीत धड मुंब्रा बायपासवर फेकून दिल्याचे तपासात उघड झाले. 'अंगावर शहारा आणणाºया या घटनेचा तपास करताना पोलीस त्याच्या घरी पोहचले. त्यांनी त्याच्या पहिल्या पत्नीला ताब्यात घेतले, तेव्हा तो त्यांच्याच १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असल्याची धक्कादायक बाब तिने पोलिसांना सांगितली. या प्रकरणात त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सोमवारी त्याला पत्नीच्या खून प्रकरणात पुन्हा अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन्ही पत्नीपासून सहा मुलेअब्दुल्ला याला पहिल्या पत्नीपासून १७ वर्षीय मुलगा, दुसरी १३, तिसरी ११ आणि चौथी आठ वर्षीय मुलगी अशी चार अपत्ये आहेत. तर चौथ्या पत्नीचा खून केला त्यावेळी तिला एक महिन्यांचा आणि दीड वर्षांचे अशी दोन मुले होती. या सहा मुलांसह तो पहिल्या पत्नीसमवेत मुंब्य्रात वास्तव्याला होता.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून