शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

मुसळधार पावसाने कल्याणमध्ये दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 01:15 IST

खाडीकिनाऱ्यांसह सखल भागात पाणी साचून मोठे नुकसान

कल्याण : संततधार पाऊस, समुद्राला आलेली भरती आणि त्यातच बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने कल्याण पश्चिमेतील खाडीकिनाऱ्यांसह सखल भागात पाणी साचून मोठे नुकसान झाले. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने २६ जुलै २००५ रोजीच्या पुराची पुनरावृत्ती होते की काय, अशी स्थिती निर्माण होऊन नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पश्चिमेतील गोविंदवाडी, रेतीबंदर, अनुपमनगर, भवानीनगर, घोलपनगर, शहाड स्टेशन परिसर, कल्याण-मुरबाड रस्ता, प्रेम आॅटो परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोहम्मद अली चौक, जोशीबाग, बैलबाजार, रोहिदासवाडा, चिखलेबाग, जिजामातानगर, लालचौकी, दुर्गामाता चौक आदी खाडीकिनाऱ्यांसह सखल भागात पाणी साचून, या परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. कल्याण स्टेशन परिसरातील लक्ष्मी भाजी मार्केट, सांगळेवाडी, भानुसागर परिसर जलमय झाला होता. पावसाचे पाणी घरात शिरण्यास सुरुवात झाल्याने या भागातील रहिवाशांनी जवळील शाळांमध्ये, बांधकाम सुरू असलेल्या इमारतींमध्ये तसेच उंच ठिकाणी आश्रय घेतला होता.शहाडहून आंबिवलीच्या दिशेने जाणारा रस्तादेखील पाण्याखाली बुडाला होता. वालधुनी नदीलगत असलेली घरे खाली करण्यात आली असून, येथील सुमारे २०० रहिवाशांना हलवण्यात आले. योगीधाम, भवानीनगर, शहाड, बंदरपाडा रोड या भागासह नियोजित सिटी पार्कचा परिसर जलमय झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर तसेच अनुपमनगर येथील महात्मा फुले पोलीस चौक परिसरही जलमय झाला होता. भवानी चौकातील केडीएमटीच्या आगारात कंबरेच्यावर पाणी साचल्याने येथील ७० हून अधिक बसबरोबरच केडीएमटी कर्मचाºयांच्या मोटारसायकलीही पाण्याखाली गेल्या होत्या. रोहिदासवाडा परिसरातील मरियम चाळ, आजाद फरीद चाळ, गौसिया मशीद परिसर, डॉ. आंबेडकर रोड, बागवान कॉलनी परिसरातील घरांमध्येही पाणी शिरले.खाडीकिनाºयाजवळील रेतीबंदर येथील घरांत पाणी शिरायला सुरुवात झाल्यानंतर, रहिवाशांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले. काहींनी गोविंदवाडी बायपास येथील पुलावर उभ्या असलेल्या टेम्पो, ट्रकमध्ये आश्रय घेतला. या परिसरात असलेल्या गोठ्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने येथील म्हशींना गोविंदवाडी बायपासवर सुरक्षित आणण्यात आले होते. लालचौकी परिसरातील देवीआशीष इमारतीच्या तळमजल्यावर तीन फूट पाणी शिरल्याने रहिवाशांनी वरच्या मजल्यांवर आश्रय घेतला होता.महापालिका क्षेत्रातील खाडीकिनाºयालगतच्या परिसरातील ३५० ते ४०० रहिवाशांना अग्निशमन विभाग, पालिका सदस्य आणि महापालिका कर्मचाºयांच्या मदतीने सुरक्षितस्थळी हलवले आहे. महापालिका प्रभागातील पुराने बाधित झालेल्या नागरिकांना प्रभाग क्षेत्र अधिकाºयांमार्फत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून सुमारे १० हजार अन्नपाकिटांचे वितरण करण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रातील पूरप्रवण परिस्थितीमुळे महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांच्या निर्देशानुसार प्रभाग क्षेत्र अधिकारी, अग्निशमन यंत्रणा, पालिका सदस्य आणि कार्यकर्ते कार्य करत होते.पालिका प्रशासन आणि पोलीस खात्याकडून वारंवार दक्षतेचा इशारा देण्यात येत होता. पाणी भरलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये किंवा एखादी दुर्घटना घडू नये म्हणून पोलीस विभाग आपले काम योग्य प्रकारे हाताळताना दिसत होते.अतिउत्साही नागरिकांची गर्दी : लालचौकी परिसरापर्यंत खाडीचे पाणी येऊन याठिकाणी असलेल्या इमारतींमध्ये शिरले होते. अतिउत्साही नागरिकांनी पुराचे पाणी बघण्यासाठी गर्दी केली होती. या पाण्यातून येजा करण्यासाठी पाचसहा होड्या सोडण्यात आल्याने या भागाला पर्यटनस्थळाचे स्वरूप आले होते.कोळसेवाडी पोलीस ठाणे पाण्याखालीकल्याण पूर्वेतील मलंगरोड पाण्याखाली गेला. आडिवली-ढोकळी परिसरातही पूरसदृश परिस्थिती होती. पूर्वेतील खडेगोळवली, कैलासनगर, काटेमानिवली सह्याद्रीनगर, विठ्ठलवाडी बसडेपो, मंगल राघोनगर, १०० फुटी रोडवरील चाळींसह कोळसेवाडी पोलीस ठाणेही पाण्याखाली गेले होते. पोलीस ठाण्यात चार ते पाच फूट पाणी शिरल्याने पोलिसांना बाहेर पडावे लागले. संतोषनगर प्रभागातील सखल भागातील घरांमध्येही पाणी शिरले होते.नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराबारवी धरण भरल्यानंतर सहा दरवाजे उघडून जादा पाणी बारवी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे बारवी व उल्हास नदीपात्रात पाणी वाढून, नदीकाठावरील गावांमध्ये शिरले आहे. खबरदारी म्हणून शनिवारी रात्रीच अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण व मुरबाड तालुक्यांतील बारवी, उल्हास नदीच्या काठावरील आसनोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोन्याचापाडा तसेच कल्याण तालुक्यातील कांबा, वरप, पावशेपाडा, रायते, म्हारळ, टिटवाळा, नडगाव, कुंदे, आणे भिसोळ, वसत, शेलवली, मोहने, गाळेगाव, दहागाव, पोई आपटी, मांजर्ली, मानिवली इत्यादी नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.दिव्यातील ८५०० जणांना सुरक्षितस्थळी हलवलेठाणे : दिव्यात रविवारी दिवसभरात सात बोटींच्या साहाय्याने टीडीआरएफ, आर्मी, अग्निशमन दल, आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने जवळपास ८५०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.या ठिकाणी रहिवाशांना स्थानिक नगरसेवकांच्या समन्वयातून मदत करण्यात आली. हे मदतकार्य सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंब्रा, दिवा, कौसा परिसरात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद होता.या परिसरातील सुमारे ६० हजार ग्राहक बाधित झाले आहेत. पाण्याचा निचरा झाल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेऊन हा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू झाल्याची माहिती उपमुख्य जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली.मीरा-भार्इंदरमध्ये ८२ जणांची सुटका : मीरा-भार्इंदर शहरांतील जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले. ठिकठिकाणी झाडे पडली. जनतानगरमध्ये चार झोपड्यांवर संरक्षक भिंत पडली. मात्र, यात कुणीही जखमी झालेले नाही. उत्तनमध्ये घराची भिंत पडली. मीरा रोड येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या ८२ जणांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली. अनेक घरांमध्ये दोन दिवसांपासून पाणी असल्याने चूल पेटलेली नाही.

टॅग्स :Rainपाऊस