नालासोपारा शहरामध्ये सर्रास वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:07 AM2020-09-23T00:07:16+5:302020-09-23T00:07:23+5:30

महावितरणचे दुर्लक्ष : वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचेकारवाईसाठी पत्र, संरक्षण देण्यास तयार

Widespread power theft in Nalasopara town | नालासोपारा शहरामध्ये सर्रास वीजचोरी

नालासोपारा शहरामध्ये सर्रास वीजचोरी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील अनेक परिसरात सर्रासपणे आकडे टाकून वीजचोरी केली जात आहे. काही टोळ्या यामध्ये सक्रिय असून महिन्याकाठी प्रत्येक घरापाठी ३०० ते ४०० रुपये घेऊन चोरीची वीज पुरवली जाते. महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असून पूर्वेकडील संतोष भवन, श्रीराम नगर, वालईपाडा व इतर विभागात महावितरणची वीजचोरी होत असल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी वसईच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून कारवाई करण्यास सुचवले आहे.
वीजचोरीवर नियंत्रण यावे, यासाठी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि लाईनमन यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे. वीजचोरी पकडली किंवा केली म्हणून पोलीस ठाण्यात तक्र ार देऊन गुन्हा दाखल करतात. पण विजेची चोरी होऊ नये म्हणून कडक पावले उचलली पाहिजेत, असेही पत्रात नमूद केले आहे.
संतोष भवन परिसरातील तांडापाडा येथे ५ आॅगस्टला राजेश यादव (३७) याच्या डोक्यावर विद्युत तार पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा होऊ नये व उपाययोजना करण्यासाठी तसेच परिसरातील विद्युत खांबांवरील लोंबकळणाऱ्या व धोकादायक वीज तारांचा सर्व्हे करून त्या वीजतारा बदली करून खांबांचीही दुरुस्ती करावी म्हणून महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्रसिंग चव्हाण यांना १८ सप्टेंबला सकाळी भेट घेऊन पत्र दिले आहे. वीजचोरीबाबत कारवाई करायची असेल तर पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येईल, असाही उल्लेख या पत्रात त्यांनी केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील वीजचोरी आणि गलथान कारभाराबाबत सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला असल्याचे तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. पाटील यांनी लोकमतला सांगितले आहे. ज्या परिसरात वीजचोरी होते, त्या विभागातील बीट अधिकाºयाला मेमोसुद्धा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत नालासोपारा शहरात कोणत्याही अत्यावश्यक सुविधा झाल्या नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Widespread power theft in Nalasopara town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.