शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

...तर कर वसुली कशाला करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:49 IST

डोंबिवली: केडीएमसीने मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बीले पाठविल्याने येथील एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण असताना आता महापालिकेच्या अधिका-यांना पत्र पाठवून सुविधा देता येत नसेलतर कराची वसुली कशाला करता अशी थेट विचारणा रहिवाशांकडून केली जात आहे. सुदर्शननगर निवासी संघाने जादा दराने कर लादण्याच्या प्रशासनाच्या कृतीचा जाहीर फलक लावून निषेध केला होता. या रहिवाशांच्या संघटनेने तर आता कर वसुलीची बीले पाठविणा-या ई प्रभागाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देसुदर्शननगरवासियांचा प्रशासनाला सवाल

डोंबिवली: केडीएमसीने मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बीले पाठविल्याने येथील एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण असताना आता महापालिकेच्या अधिका-यांना पत्र पाठवून सुविधा देता येत नसेलतर कराची वसुली कशाला करता अशी थेट विचारणा रहिवाशांकडून केली जात आहे. सुदर्शननगर निवासी संघाने जादा दराने कर लादण्याच्या प्रशासनाच्या कृतीचा जाहीर फलक लावून निषेध केला होता. या रहिवाशांच्या संघटनेने तर आता कर वसुलीची बीले पाठविणा-या ई प्रभागाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.एमआयडीसी निवासी भागात बहुतेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यावरील खड्डे व धुळीने नागरीकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. फवारणी हा प्रकार येथे बंद झाला असून परिणामी डास आणि किडयांची बेसुमार वाढ झाली आहे. छोटी-मोठी गटारांची साफसफाई, कचरा उचलणे आदि सेवा नियमित होत नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. स्वच्छता राखली जात नाही, रस्त्यांची वाताहत, भटक्या कुत्र्यांचा उपद्रव याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही याची दखल घेतली जात नसल्याचे ज्येष्ठ नागरीक वसंत शिंदे यांनी सांगितले. कच-याप्रश्नी ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करून महापालिकेला देण्यास आम्ही सुरूवातही केली आहे पण प्रशासनाची मानसिकता नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. तर केडीएमसी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आम्ही किती सहन करायचे, आम्हाला होणा-या त्रासाची दखल घेत नसाल तर कर वसुली कशाला करता? असा सवाल सुदर्शननगर निवासी संघाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केला आहे. डोंबिवली वेलफेअर असोसिएशनने आधीच ‘सेवा नाही तर कर नाही’ असा आंदोलन छेडण्याचा पवित्रा घेतला आहे. सुधारणा होण्यासाठी महापालिकेला असोसिएशनने १५ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तर वाढीव कराच्या बीलांप्रकरणी स्थानिक आमदार सुभाष भोईर आणि २७ गावांमधील लोकप्रतिनिधी आणि पदाधिका-यांनी आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन चर्चाही केली होती. याउपरही परिस्थिती जैसे थे राहील्याने सुदर्शननगर निवासी संघाने पत्र पाठवून कराची वसुली कशाला करता असा पवित्रा घेतल्याने रहिवाशी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष असाच सुरू राहण्याची चिन्हे आहेत. ई प्रभागाला पाठविलेल्या पत्राची प्रत आयुक्त बोडके यांच्यासह स्थानिक नगरसेविका पुजा म्हात्रे यांनाही पाठविली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीthakurliठाकुर्ली