शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

रिंग रोड हवाच कशाला?,रिपाइंचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:28 IST

शहर विकास आराखड्यातील रिंग रोडमुळे झोपडपट्यांवर बुलडोझर फिरणार असल्याने अनेक बेघर होणार आहेत. गरीबांची घरे जाणार असतील तर रिंग रोड कशाला असा सवाल करत शिवसेना

उल्हासनगर : शहर विकास आराखड्यातील रिंग रोडमुळे झोपडपट्यांवर बुलडोझर फिरणार असल्याने अनेक बेघर होणार आहेत. गरीबांची घरे जाणार असतील तर रिंग रोड कशाला असा सवाल करत शिवसेना, काँॅग्रेस, ओमी टीम, राष्ट्रवादी, भारिप, पीआरपी व मनसेने विरोध केला आहे. त्यांच्यात सध्या बैठका सुरू आहेत.१३ किलोमीटरच्या क्षेत्रफळाच्या शहराला रिंग रोड हवाच कशाला? असा प्रश्न रिपाइचे प्रदेश सचिव नाना पवार, प्रदेश उपाध्यक्ष महादेव सोनावणे यांनी केला. साई पक्षाचे नगरसेवक गजानन शेळके यांनी तर रिंग रोडमुळे एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के नागरिक बेघर होणार असल्याचे सांगून विरोध केला.शहरातील ९० टक्के नगरसेवकांना शहर विकास आराखडा समजला नाही. माहिती विचारण्यास आलेल्या प्रभागातील नागरिकांना काय उत्तरे देऊ? असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहे. गुरूवारी महापौर मीना आयलानी यांनी विशेष महासभा बोलावली आहे. महासभेत शहरविकास आराखडा बनवणारी अहमदाबाद येथील सेफ्ट कंपनीचे अधिकारी आराखडा समजावून सांगणार आहेत.उपमहापौर जीवन इदनानी यांनी तर रिंग रोड व्यतीरिक्त जुनाच शहर विकास आराखडा पुन्हा प्रसिध्द केल्याची टीका केली. जुन्या शहर विकास आराखडयातील खुली जागा, आरक्षित भूखंड, बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागा यावरील ग्रीन झोनचे आरक्षण उठवण्यात आले आहे. एकूणच शहर विकास आराखडा बिल्डर धार्जिणा असल्याची टीका सर्वच पक्षाचे नगरसेवक करत आहे.मनसेचे शहर-जिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, संजय घुगे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष बंडू देशमुख, मनोज शेलार, मैनूवुद्दीन शेख यांनी पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची भेट घेऊन आराखडा मराठीतून प्रसिध्द करण्याची मागणी केली.रिंग रोडचा प्रश्न ऐरणीवरभाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी, महापौर मीना आयलानी यांनी महापौर कार्यालयात बैठक बोलावली होती. आयुक्त राजेंद्र निंबाळकर हेही उपस्थित होते. बैठकीत शहरातील रस्त्यासह पाणीटंचाई व रिंग रोडबाबत चर्चा झाली. रिंग रोडमध्ये झोपडपट्टीसह बॅरेकची व ब्लॉकवरील घरे, इमारती येत असल्याचा प्रश्न व्यक्त झाला असून चर्चेनंतर सोडवण्याचे आश्वासन आयलानी व महापौरांनी दिले.ज्योती कलानी यांची बैठकआमदार ज्योती कलानी यांनी कलानी महल येथील निवासस्थानी ओमी टीमसह वास्तूविशारद यांची बैठक रविवारी घेतली. बैठकीत रिंग रोडबाबत चर्चा होऊन विरोध करण्याचे ठरले आहे. नवीन विकास आराखडयातील रस्त्यांमुळे आमदार ज्योती कलानी यांचे आमदार निवासही बाधित होणार आहे. तसेच रिंग रोड त्यांच्या बंगल्याच्या मागील झोपडपट्टीतून जात असल्याने, परांपरागत मतदार नाराज होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर