शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल करू नका असे का म्हणीन? हरिजन याचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:45 IST

मॅक्सस मॉलसमोरील ‘चाय सुटा बार’ या चहाच्या दुकानाबाहेर सोमवारी रात्री वाहतूककोंडी झाली,

मीरा रोड : वाहतूककोंडी झाल्याने गाडी पुढे घ्या, असे सांगितल्याचा राग येऊन मारहाण केल्याप्रकरणी आपण रोज गुन्हा दाखल करा, म्हणून पोलीस ठाण्यात जात आहोत. यामुळे गुन्हा दाखल करू नका, असे म्हणण्याचा प्रश्नच नसल्याचे सुरक्षारक्षक मारुती हरिजन याने म्हटले आहे. यावरून भार्इंदर पोलीसच राजकीय दबावाखाली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे .

मॅक्सस मॉलसमोरील ‘चाय सुटा बार’ या चहाच्या दुकानाबाहेर सोमवारी रात्री वाहतूककोंडी झाली, म्हणून आमदार नरेंद्र मेहता यांना त्यांची गाडी पुढे घेण्यास सांगणाऱ्या हरिजन याला मेहतांनी मारहाण करत त्याची कॉलर गच्च धरून दुकानापर्यंत ओढत नेले होते. त्यामुळे त्याला श्वास घेणे अवघड झाले. मेहतांसह त्यांच्या सहायकानेही अरेरावी करत हरिजन याला मारहाण केली. तशी फिर्याद देण्यास गेलेल्या हरिजन यालाच अर्ज द्या, असे सांगून भार्इंदर पोलिसांनी बोळवण केली.

भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आर.के. जाधव यांनी मात्र तक्रारदारानेच गुन्हा नोंदवायचा नसल्याचे म्हटले होते, असे सांगितल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये येताच हरिजन याने मात्र आपण गुन्हा दाखल करण्यासाठी रोज पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहोत. शनिवारी सकाळीही दोन तास पोलीस ठाण्यात होतो, असे त्यांनी सांगितले.पुरावा कुणी नष्ट केलाहरिजन यांच्या स्पष्टीकरणामुळे भार्इंदर पोलीसच गुन्हा दाखल करण्यास टोलवाटोलवी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.दुसरीकडे चहाच्या दुकानचालकाने घटनेचा सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा कुणाच्या दबावाखाली डिलिट केला, असा सवाल केला जात असून पुरावा नष्ट करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.व्हायरल झालेल्या व्हिडीओतही मेहता व त्यांच्यासोबत असलेले हे रागात बोलत असल्याचे तसेच त्यांच्यासोबतची व्यक्ती हरिजन याला मारत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक