शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे; घोडबंदरवरील रस्त्यांच्या विरोधात मनसेचे आंदोलन

By अजित मांडके | Updated: July 15, 2024 17:47 IST

यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरुपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केल्याचे दिसून आले.

ठाणे :  घोडबंदरवरील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरुपाच्या घोषणा देत प्रशासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेने केल्याचे दिसून आले.ठाण्यात विविध प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. माजिवडा, कापुरबावडी, मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता असेल, या सर्वच रस्त्यांवर सध्या खड्डेच खड्डे असे चित्र आहे. त्यात घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. तसेच कोणत्याही स्वरुपाचे नियोजन न करता येथील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रीटचे काम ऐन पावसाळ्यात सुरु झाले आहे. त्यामुळे वाहतुक कोंडी आणि रस्त्यांना पडलेल्या भल्या मोठ्या खड्यांमुळे वाहन चालकांचे हाल सुरु झाले आहेत. तीनच दिवसापूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबधींत प्राधिकरणाच्या अधिकाºयांबरोबर पाहणी केली होती. त्यानंतर तत्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे आदेशही दिले होते. परंतु आता याच खड्यांच्या विरोधात मनसे आता रस्त्यावर उतरली आहे. सोमवारी सांयकाळी मनसेचे शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनी आपल्या समर्थकांसह येथील वेदांत हॉस्पीटल समोरील रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते याच खड्यात बसले होते. यावेळी पदाधिकाºयांनी कशाला गाताय विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत हे आंदोलन केले.घोडबंदर भागात रस्त्यांना खड्डे पडले असतांना आयुक्त एसीत बसले आहेत. याच खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, दुचाकीस्वार पडत आहेत, त्याला जबाबदार कोण, यावर तत्काळ उपाय करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी मोरे यांनी दिला.

 

टॅग्स :Potholeखड्डेtmcठाणे महापालिका