शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

चौकाला नाव कोणाचे, आनंद दिघे की साई गुरुमुखदास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 19:12 IST

उल्हासनगरातील नेताजी चौकाच्या नामकारणाचा घोळ

- सदानंद नाईकउल्हासनगर : नेताजी चौकाच्या नामकारणाचे दोन प्रस्ताव महासभेत मंजूर झाल्याने चौक नामकरण बाबत शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी बैठक झाली. बैठकीला महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, सभागृहनेते भरत गंगोत्री, माजी उपमहापौर जया साधवानी, शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांच्यासह पालिका अधिकारी आदीजन उपस्थित होते.

 उल्हासनगर महापालिका महासभेत कॅम्प नं-५ येथील मुख्य नेताजी चौकाचे नामकरण शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर महासभेत त्याच नेताजी चौकाला सिंधी समाजाचे संत साई गुरुमुखदास यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध करून चौकाचे यापूर्वी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आनंद दिघे असे नामकरण झाल्याचे सांगण्यात आले. तेव्हा ज्या नामकरण प्रस्तावाला महासभेने प्रथम मंजूरी दिली. तो प्रस्ताव अधिकृत असणार असल्याची भूमिका महापालिका प्रशासन द्वारे घेण्यात आली. दरम्यान नेताजी चौकाच्या नामकारणावरून वाद होऊन माजी उपमहापौर जया साधवानी यांनी यातून तोडगा काढण्यासाठी सदर विषय थेट विधानसभेचे सभापती नाना पाटोळे यांच्याकडे नेला.

 शहरातील चौकाचा नामकरण विषय असल्याने, आपसात चर्चा करून सोडविण्याचा सल्ला त्यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे यांनी दिला. त्यानुसार शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. यावेळी महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, सभागृहनेते भगवान भालेराव, शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान, माजी उपमहापौए जया साधवानी यांच्यासह इतर पक्ष पदाधिकारी, पालिका अधिकारी उपस्थित होते. शिवसेनेकडून आनंद दिघे तर भरत गंगोत्री व जया साधवानी यांच्याकडून साई गुरुमुखदास यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला. चर्चेत नामकरणावर ठोस निर्णय न झाल्याने, अखेर महापालिका आयुक्त व लोकप्रतिनिधी योग्यवेळी निर्णय घेतील. असा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPoliticsराजकारण