शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांचे मुलांवर प्रेम त्यांनीच शिक्षक व्हावे : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 15:44 IST

व्यास क्रिएशन्सच्यावतीने शिक्षक दिन ते जागतिक साक्षरता दिन या दरम्यान ज्ञानसाधकांना अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देज्यांचे मुलांवर प्रेम त्यांनीच शिक्षक व्हावे : ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाडव्यास क्रिएशन्सच्यावतीने ज्ञानसाधकांना अभिवादन शिक्षकवृंदांनी केले या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक

ठाणे: शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना प्रेम देतात तेव्हा १० पटीने ते शिक्षकांकडे परत येते. ज्यांचे मुलांवर प्रेम त्यांनीच शिक्षक व्हावे असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी ठाण्यात व्यक्त केले.      व्यास क्रिएशन्सच्यावतीने ज्ञानसाधकंना मानवंदना या कार्यक्रमाद्वारे सर्व गुरूवर्य आणि शिक्षकांना आदरांजली देण्यात आली. शुभंकरोती हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. वाड म्हणाल्या की, वुई आर डिलींग विथ लाईफ नॉट विथ फाईल. मी शिक्षक असल्याचा अभिमान आहे. शिक्षक शाळेतच घडत असतात. तुमचा चेहरा तुमचे भविष्य नाही असे त्यंनी सांगितले. सौंदर्याचा मार्ग हृदयापासून सुरू होऊन कर्तुत्वापर्यंत पोहोचत असतो हे जेव्हा शिक्षकांना उमगते तेव्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार मिळतो. यावेळी त्यांनी लिहीलेल्या पॉझीटिव्ह स्ट्रोक या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई यांनी त्यांच्या शाळेतील आठवणी सांगितल्या. दत्तात्रय मेहेंदळे, अशोक - शुभा चिटणीस, अविनाश - नंदिनी बर्वे, सुरेंद्र दिघे, वैदेही दफ्तरदार, मीना क्षीरसागर, एकनाथ आव्हाड, पांडुरंग साळुंखे, डॉ. विजया वाड या ज्ञानसाधकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी सुरूवातीला प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, परिक्षीत प्रभुदेसाई उपस्थित होते. शेवटी योगेश जोशी यांचा आसु आणि हसू हा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे, पुणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर या भागातील सुमारे पाच हजार शिक्षकांशी व्यास क्रिएशन्स्च्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना शुभेच्छा पत्र देऊन मानवंदना दिली. शिक्षकवृंदांनी या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई