शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्सअप ट्रिपल तलाक प्रकरणी पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:30 IST

भिवंडी : मागील आठवड्यात शहरात गाजलेल्या व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून दिलेल्या तीन तलाक प्रकरणी अखेर भोईवाडा पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांच्या ...

ठळक मुद्देमुस्लिम स्त्रियांच्या लग्नाचे हक्क संरक्षण करणाºया कलमान्वये गुन्हा दाखलभिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी प्रथमच गुन्हा दाखलमोबाईलमध्ये व्हॉट्सअप करून दिला ट्रिपल तलाक

भिवंडी : मागील आठवड्यात शहरात गाजलेल्या व्हॉट्सअप मॅसेजच्या माध्यमातून दिलेल्या तीन तलाक प्रकरणी अखेर भोईवाडा पोलिसांनी पतीसह सासू सासऱ्यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे .शहरातील पिडीत महिला आरजू ही सध्या कल्याण कोळसेवाडी या ठिकाणी वास्तव्यास असून नदीम शेख याच्या बरोबर तीचा विवाह सन २०१४ साली झाला होता. लग्नानंतर काही काळातच पीडित विवाहित महिला आरजू हिचा पती नदीम सासू आयशा व सासरे यासिन शेख यांनी हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ सुरू केला. तिच्याकडे माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावला आणि तीला मारहाण करून घराबाहेर काढले. सध्या ती शहरातील आपल्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतानाच तिच्या मोबाईलच्या व्हाट्सअ‍ॅपवर तीन वेळा तलाक लिहिलेला मेसेज करून तिला तलाक दिल्याचे कळविले .या प्रकरणी पीडित महिला मागील पंधरा दिवस पोलीस व महिला मंडळांकडे न्यायासाठी फिरत होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी पूर्ण तपासाअंती गुन्हा दाखल केला जाईल,असे आश्वासन पिडीत महिलेला दिले. मंगळवार १४ मे २०१९ रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात महिलेचा जबाब नोंदवून पती नदीम व उत्तरप्रदेश येथे राहणारे सासरे यासीन व सासू आयेशा या तीनजणां विरोधात भादंवि कलम ४९८(अ), ३२३,५०४,३४ यासह मुस्लिम स्त्रियांच्या लग्नाचे हक्क संरक्षण करणारे दि २९ फेब्रुवारी २०१९ चे अध्यादेश चे कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पोलीस ठाण्यात अशा प्रकारचा पहिला गुन्हा नोंद झाल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी