शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

युती टिकवायची की नाही, ते शिवसेनेच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:32 IST

शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही

ठाणे : शिवसेना-भाजपाची युती व्हावी, असे भाजपाचे मत असून तसा प्रस्तावही त्यांना दिला आहे. आमची युतीही जुनी आहे, यापुढे ती टिकवायची किंवा नाही, याचा चेंडू आता शिवसेनेच्या कोर्टात असल्याची माहिती खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने विकासाची माहिती देताना बुधवारी ते बोलत होते.पेट्रोल, डिझेलचे वाढणारे भाव ही चिंतेची बाब आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी कर कमी करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हे दर वाढले म्हणून महागाई वाढली, असा निष्कर्ष सरसकट काढता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. राज्य सरकारांनी कर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईचा दर हा ९.८ टक्के एवढा होता. तोच दर आता ४.२८ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे त्या सरकारच्या कारभाराशी तुलना करता सध्या महागाई आटोक्यात असल्याचा दावा सहस्रबुद्धे यांनी यावेळी केला.मागील चार वर्षांत भाजपा सरकारने केवळ हायवे, रस्ते विकास यावरच भर दिलेला नाही, तर तळागाळातील नागरिकांचा विकास करण्यावर अधिक भर दिल्याची माहिती त्यांनी दिली.आधारकार्डची जरी सक्ती वाटत असली, तरीदेखील त्या माहितीचा फायदाच झाला असून त्यामुळे ५० हजार कोटी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात करदात्यांची संख्या तीन कोटी ८६ लाख एवढी होती. आता हाच आकडा दुप्पट होऊन सहा कोटी ८३ लाखांच्या घरात गेल्याकडेही सहस्रबुद्धे यांनी लक्ष वेधले.बुलेट ट्रेनबाबत काही राजकीय मंडळींकडून दिशाभूल केली जात आहे. परंतु, शेतकऱ्यांची मने वळवली जातील आणि त्यांच्या मतानुसारच पुढील निर्णय घेतला जाईल. सुरुवातीला कोणत्याही नव्या प्रकल्पाला विरोध हा होतच असतो. परंतु, नंतर तो मावळतो. त्यामुळे बुलेट ट्रेनचा विरोधदेखील मावळेल, अशी आशा सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.