शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आधीचे कच-याचे डबे कुठे?; मनसे, माजी नगरसेवकाने उठवला आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:39 IST

शहरातील ओला व सुका कच-याच्या वर्गीकरणासाठी तब्बल ६ कोटीच्या निधीतून ३ लाख ४४ हजार डब्यांची खरेदी पालिका करणार अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली.

उल्हासनगर : शहरातील ओला व सुका कच-याच्या वर्गीकरणासाठी तब्बल ६ कोटीच्या निधीतून ३ लाख ४४ हजार डब्यांची खरेदी पालिका करणार अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची दखल आजी-माजी नगरसेवक, मनसे, पीआरपी यांनी घेत याविरोधात आवाज उठविला आहे. आधीचे पाच हजार डबे गेले कुठे अशी प्रश्नांची सरबत्ती आयुक्तांवर करत नागरिकांचा पैसा वाया जाऊ देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी दिला आहे.उल्हासनगर पालिकेतील सावळागोंधळामुळे आयुक्त राजेंद्र निंबाळकर वारंवार वादाच्या भोवºयात सापडले आहेत.कचरा डबे खरेदीवरूनही ते अचडणीत येण्याची शक्यता आहे. पालिकेत एकूण १ लाख ७२ हजार मालमत्ताधारक आहेत. असे गृहीत धरून कचºयाच्या डब्यासाठी निविदा मागवली होती. ओला व सुका कचºयासाठी हिरवा व निळ््या रंगाचे डबे देणार आहेत. एक डब्याची १७५ तर दोन डब्याची ३५० किंमत आहे. १ लाख ७२ हजार मालमत्तांपैकी ३० टक्के अस्तित्वातच नाहीत. मग एकूण मालमत्तेच्या ३० टक्के मालमत्ताधारकांना डबे कसे देणार, असा प्रश्न मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, पीआरपीचे नगरसेवक व जिल्हाध्यक्ष प्रमोद टाळे यांनी आयुक्तांना केला आहे.माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी कचºयाच्या डब्याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट टाकली होती. आयुक्त निंबाळकर यांनी दखल घेत, त्यांना चर्चेसाठी बोलावले. आयुक्तांनी त्यांना शहरातील स्वछता व डब्यांबाबत माहिती दिली. मालवणकर यांना स्वच्छतेचा मंत्र आवडला असला तरी डब्याची चढत्या किंमतीत खरेदी का? हा प्रश्न पडला. त्यांनी दुकान गाठून १० लिटरचे डबे खरेदी केले. खरेदीचे बिल सोशल मिडीयावर टाकून किमतीबाबत प्रश्न उपस्थित केला. मालवणकर यांच्या पोस्ट बाबत आयुक्तांनी पुन्हा त्यांच्याकडे विचारणा करून नाराजी व्यक्त केली. कर रूपाने आलेला नागरिकांचा पैसा आहे. मी असा खर्च करू देणार नसल्याचे आयुक्तांना ठणकावून सांगून आंदोलनाचा इशारा दिला.कचरा डबे खरेदी घोटाळा आयुक्तांच्या आशीर्वादने होत असल्याचा आरोप कदम यांनी केला. घोटाळ््याबाबत मुखमंत्र्यांसह संबंधितांना निवेदन देणार असल्याची माहिती दिली. पालिकेत इकते होऊनही सत्ताधारी मात्र मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ते प्रशासनाला का जाब विचारत नाही अशी चर्चा सुरू आहे.

टॅग्स :thaneठाणेMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना