शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उर्वरित २०० मंडळांच्या परवानग्या अडल्या कुठे? पालिका उपायुक्तांनी केली गणेशोत्सव समितीशी चर्चा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 12, 2023 18:35 IST

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व मंडळांची बैठक बोलवली होती.

ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंगळवारी ठाणे महापालिका प्रशासनाने सर्व मंडळांची बैठक बोलवली होती. यात २८० पैकी ८० मंडळांना परवानग्या मिळाल्या आहेत. २०० मंडळांच्या परवानग्या कुठे अडल्या आहेत याची माहिती उपायुक्तांनी घेतली. यावर गणेशोत्सव समन्वय समितीशी सविस्तर चर्चा करुन पालिकेने सकारात्मक प्रतिसाद समितीला दिली आहे. 

दरवर्षी मंडळांना परवानगी मागण्यापेक्षा सरसकट पाच वर्षांसाठी परवानगी मिळावी हा महत्त्वाचा मुद्दा समितीने मांडला असता त्याचे नियोजन पुढच्यावर्षीपासून करण्याचा प्रयत्न असेल असे पालिकेने आश्वासित केले आहे. शासनाचा जीआर निघाला नाही तर मंडळांकडून प्रतिज्ञापत्रे घेऊन त्यांवा पाच वर्षांची परवानगी दिली जाईल असे पालिका प्रशासनाने सांगितले. उपायुक्त जी. जी गोदापुरे यांनी गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक त्यांच्या दालनात बोलविली होती. यावेळी अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही त्यामागचे कारण जाणून घेऊन अग्निरोधक यंत्र मिळण्याबाबत गणेशोत्सव मंडळांना संपर्क क्रमांक देऊन ते घेतल्यावर तिथल्या तिथेच अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिली. 

वागळे इस्टेट क्रमांक १६ येथे टाकण्यात आलेल्या दुभाजकामुळे गणेश आगमन आणि विसर्जनात अडथळा निर्माण होऊ शकतो, तो हटविण्यात यावा, ओव्हरहेड वायरमुळे मुर्तींचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महावितरण विभागाला त्या तात्काळ हटविण्यात येण्याची, मंडपांच्या आजूबाजूला धुळखात पडलेले वाहने, गणेशभक्तांची दर्शनासाठी होणारी गैरसोय टाळण्यासाठी हातगाड्या हटविण्याची सूचना करावी, विसर्जन घाटावर गणेशाचे विसर्जन करताना मुर्ती तुटतात, त्या मागचे अडथळे दूर करावे अशी मागणी समितीने केली असता उपायुक्तांनी यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल असे आश्वासन समितीला दिले.  यावेळी समितीचे अध्यक्ष समीर सावंत, उपाध्यक्ष रविंद्र पालव उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवthaneठाणे