शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

‘त्या’ कामाला मुहूर्त कधी लाभणार? सावित्रीबाई नाट्यगृहातील कामाचे कार्यादेश अद्याप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 03:12 IST

देखभाल दुरूस्तीसाठी एप्रिल २०१७ पासून बंद असलेले येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल दीड वर्षांनी खुले झाले. त्याच्या दुरूस्तीकामातील विलंबाचा हा कित्ता आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या बाबतीतही गिरवला जात आहे.

- प्रशांत मानेडोंबिवली - देखभाल दुरूस्तीसाठी एप्रिल २०१७ पासून बंद असलेले येथील आचार्य अत्रे रंगमंदिर तब्बल दीड वर्षांनी खुले झाले. त्याच्या दुरूस्तीकामातील विलंबाचा हा कित्ता आता डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या बाबतीतही गिरवला जात आहे. नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बदलण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नाट्यगृह बंद आहे. परंतु, दोन महिने उलटायला आले, तरी या कामाचे कार्यादेश संबंधित कंत्राटदाराला देण्यात आलेले नाहीत. कामाला होत असलेल्या विलंबामुळे डोंबिवलीकरांची सांस्कृतिक उपासमार सुरूच असून रसिकांसह कलाकरांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे. साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.केडीएमसीकडून दुरूस्तीसाठी अत्रे नाट्यगृह बंद करून वर्षाचा कालावधी उलटला तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नव्हती. हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल दीड वर्ष लागले. या नाट्यगृहाचा पडदा अखेर महापालिकेच्या वर्धापनदिनी १ आॅक्टोबरला उघडण्यात आला. तर डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृह हे नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवण्यासाठी ८ सप्टेंबरपासून बंद ठेवण्यात आले आहे. गणेशोत्सवात नाट्यप्रयोग बंद असतात, ही संधी महापालिकेकडून साधण्यात आली खरी, परंतु, आता दिवाळीचा कालावधी उलटून जाऊ लागला तरी या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. यासंदर्भातील निविदा प्रक्रियाही पार पडून या कामाला स्थायीची मान्यताही मिळाली आहे. परंतु, कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. नाट्यगृहामधील वातानुकूलित यंत्रणा बिघडल्याने गेल्यावर्षीच्या दिवाळीपासून भाडेतत्त्वावर यंत्रणा चालवली जात होती. तिची मुदत ७ सप्टेंबरला संपुष्टात आल्याने नवीन यंत्रणा बसविण्यासाठी नाट्यगृह बंद करण्यात आले. या कामासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामुळे नाट्यगृह नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा होती.मात्र, अद्याप कामच सुरू न झाल्याने ही अपेक्षा फोल ठरली. परिणामी, आता फेब्रुवारी अखेरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. फुले नाट्यगृह एमआयडीसी भागात आहे.अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर चिलर यंत्रणारासायनिक कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणाचा फटका नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणेला बसला असून ती खराब झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता नवीन यंत्रणा लावताना अत्रे रंगमंदिराच्या धर्तीवर चिलर वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येणार आहे.दरम्यान, सोमवारी रंगभूमीदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी कलाकारांनी नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती उपस्थित महापालिका अधिकाºयांकडे केली. लवकरात लवकर यंत्रणा बसविण्यात यावी अशी मागणी केली आहे.आम्ही कलावंत महाराष्ट्रभर आमचे प्रयोग करत असतो जेव्हा नाट्यगृहांची दुरूस्तीची कामे घेतली जातात ती दिलेल्या मुदतीत होणे अपेक्षित होते. परंतु विलंब लागत असल्याने कलावंतांचीही मोठी गैरसोय होते आणि रसिकांचीही परवड होते. आता सावित्रीबाई नाट्यगृहाच्या कामासाठी चार महिन्यांचा कालावधी सांगितला जात आहे. त्या मुदतीत काम व्हावे ही अपेक्षा आहे.- आनंद म्हसवेकर, लेखक, दिग्दर्शक आणि नाट्य निर्माता संघ सदस्यकंत्राटदाराला कामाचे कार्यादेश देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, यासंदर्भातला करारनामा होऊन पुढील आठवड्यापर्यंत कार्यादेश दिले जातील, कामाला विलंब लागणार नाही.- प्रमोद कुलकर्णी, शहर अभियंता, केडीएमसी

टॅग्स :thaneठाणे