शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

त्या ५५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना पालिका केव्हा देणार भरपगारी सुटटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:49 IST

ठाणे महापालिकेच्या विविध सेवेत कार्यरत असलेल्या ५५ वर्षावरील कर्मचाºयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भर पगारी सुटटी देण्याची मागणी केली जात आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून या संदर्भात अद्यापही कोणत्याही स्वरुपाचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही.

ठाणे : मुंबईत ५५ वर्षावरील पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यानंतर ५५ वर्षावरील पोलिसांना सुटटी देण्यात आली आहे. तशीच मागणी आता ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबततही होऊ लागली आहे. अगदी सेवानिवृत्तीला आलेल्या कर्मचाºयांसह, मधुमेह, ह्रदय विकार, दमा आणि इतर आजार असलेल्या कर्मचाºयांना देखील कोरोनाच्या ड्युटया लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनाही भरपगारी सुटटी देण्यात यावी अशी मागणी म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.            ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ३५० च्या घरात गेली आहे. कोरोनाची लागण होण्यामध्येही ४० ते ६० वर्ष वयोगटातील नागरीकांचा अधिक समावेश आहे. तर मृत पावलेल्यांमध्येही ५५ वर्षावरील नागरीकांचा अधिक समावेश आहे. दुसरीकडे मुंबईत ५५ वर्षावरील वयोगटातील पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यानंतर ५५ वर्षावरील पोलिसांना सुट्या देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील अशा कर्मचाºयांनाही सुटया देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच महापालिका कर्मचारी कोरोनाविरुध्दच्या लढाईत नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी झटत आहेत. अशा स्थितीत कर्मचाºयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून म्युनिसिपल लेबर युनियनचे अध्यक्ष रवीराव यांनी आयुक्त विजय सिंघल यांना पत्र पाठवून काही मागणी केल्या आहेत. त्यामध्ये जे कर्मचारी ५५ वर्षावरील आहेत व त्यांना मधुमेह, ह्रदय विकार, दमा व इतर आजार आहेत, अशा कर्मचाºयांना भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ५५ वर्षावरील इतर कर्मचाºयांना कोरोनाशी संबंधित कामकाज न देता त्यांना इतर काम देण्यात यावे, अशाप्रकारची मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत तातडीने निर्णय घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या