शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कंपन्या सुरू तरी कधी होणार? उद्योगमंत्र्यांसमवेत वेबिनारद्वारे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 02:45 IST

‘कामा’चा सवाल : उद्योगमंत्र्यांसमवेत वेबिनारद्वारे चर्चा

डोंबिवली : कोरोनामुळे देशाचेच अर्थचक्र ठप्प झाले आहे. पण, त्यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, केडीएमसी हद्दीत दुकाने, बाजारपेठा सुरू झाल्या आहेत. त्याचप्रमाणे एमएमआरडीए हद्दीतील कारखाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (कामा) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. डोंबिवली एमआयडीसीतील ४८० कारखान्यांमधील दीड लाख कामगारांच्या हाताला पुन्हा रोजगार कधी मिळेल? असा सवालही असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी यावेळी केला.

अर्थचक्रास गती देण्यासाठी उद्योजकांच्या मागणीखातर मंगळवारी वेबिनारद्वारे देसाई यांनी राज्यातील एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सोनी यांनी ‘कामा’ची भूमिका मांडली. त्यावर देसाई यांनी अत्यावश्यक सेवेतील कारखान्यांबरोबरच इतर कारखानेही सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमोर प्रस्ताव मांडला असल्याचे सांगितले. यासंदर्भात पुन्हा चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कारखानदारांचे चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारखानदारांना कर भरण्यासाठी मुदत वाढवून दिली आहे. अजून एक महिना मुदत वाढवून मिळेल का? यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी विलगीकरण दिवसाचा कालावधी कमी करा, कच्चा माल, उत्पादने ने-आण करण्यासाठी जिल्हांतर्गत वाहतूक सुरू करावी, मजुरांच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्था सुरू करावी. कर्मचाऱ्यांच्या विम्याबाबतच्या समस्या सोडवाव्यात आणि पाणीपट्टी मूळ दराप्रमाणेच आकारावी, अशा मागण्या अन्य ठिकाणच्या कारखानदारांनी केल्या.दरम्यान, यावेळी डोंबिवलीतील एमआयडीसीचे अधिकारीही वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.नियमांचे पालन करण्याची दिली हमीच्डोंबिवलीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत नसल्याने अत्यावश्यक सेवेतील कंपन्यांमध्ये सध्या कर्मचारी येत नसल्याची माहिती या वेळी सोनी यांनी देसाई यांना दिली.च्कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी कारखानदार निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर, मास्क, गरजेनुसार कोट तसेच सर्व नियामांचे पालन करतील, अशी हमी यावेळी उद्योजकांनी देसाई यांना दिली.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईMIDCएमआयडीसी