शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

स्वच्छ आॅगस्ट क्रांती ‘एक्स्प्रेस’ धावणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:52 IST

शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे.

नारायण जाधव ठाणे : शहरांना स्वच्छतेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांच्या क्षेत्रात आॅगस्टचा पहिला आठवडा उलटला, तरी ही स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती एक्स्प्रेस अजून धावलेलीच नाही.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जमा होणाऱ्या घनकचºयाचे वर्गीकरण करून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करावी, यासाठी नगरविकास विभागाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याला अनेक शहरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. काही शहरांवर अनुदानबंदीची कुºहाड उगारूनही अद्याप त्यांनी गती पकडलेली नाही.जिल्ह्यातील सहाही महानगरे अंधारातचराज्यातील महानगरांसाठी नगरविकास विभागाने १ ते ३१ आॅगस्ट या काळात ‘स्वच्छ आॅगस्ट क्रांती’ हे अभियान सुरू केले आहे. परंतु, त्यात पहिल्या आठवड्यात तरी राज्यासह ठाणे जिल्ह्यातील पुरस्कार मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेसह एकाही महापालिका अथवा नगरपालिकेने एकही विशेष कार्यक्रम राबवलेला नाही.काय आहे स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रम?स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपरोक्त कालावधीत दैनंदिन घनकचºयापैकी ८० टक्के निर्मितीच्या जागीच ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, घरोघरी जाऊन १०० टक्के कचºयाचे संकलन व वाहतूक करणे, वर्गीकरण केलेल्या कचºयावर १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया करून त्याचा अहवाल रोज नेमलेल्या प्रशासन अधिकाºयास पाठवावा. प्रशासन अधिकाºयाने प्रत्यक्ष पाहणी करून तो अहवाल विभागीय उपसंचालक किंवा विभागीय आयुक्तांना पाठवायचा आहे. ज्या नगरपालिका या काळात उद्दिष्टपूर्ती करतील, त्यांना देण्यात येणाºया रस्ता अनुदानासह वैशिष्ट्यपूर्ण अनुदाने देण्याबाबत विचार केला जाईल.जिल्ह्यात कचराकोंडीसंपूर्ण देश २०१८ पर्यंत स्वच्छ करण्याच्या उद्देशाने देशभर २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. त्याच धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवड, भिवंडी, भुसावळ यासारख्या शहरांनी उल्लेखनीय कामगिरी करून स्वच्छतेची पारितोषिके पटकावली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाहवा मिळवली. परंतु, राज्यातील ३८४ पैकी मोजक्या शहरांनी ही कामगिरी केली आहे. महापालिका आणि नगरपालिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाºया ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भार्इंदरसह पालघरची वसई-विरार आणि रायगडची पनवेल या महापालिका आणि अंबरनाथ-बदलापूर, उरण, पेण, अलिबाग, खोपोली, महाड यासारखी शहरे अजून कचरा वर्गीकरणाच्या बाबतीत चाचपडत आहेत.या शहरांतील बहुसंख्य प्रभागांत कचºयाच्या निर्मितीच्या ठिकाणी ओले आणि सुके वर्गीकरण होत नाही. त्यावर, शास्त्रोक्त प्रक्रिया होत नाही. ठाणे महापालिकेने मागवलेल्या प्लाझ्मा तंत्रज्ञानावर आधारित कचरा विल्हेवाटीच्या कंत्राटाच्या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात तर सारे कागदावरच आहे.येत्या काळात जाग येईल काय? : पहिला आठवडा संपला, तरी येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात नगरविकास विभागाने दिलेल्या स्वच्छ आॅगस्ट क्रांती कार्यक्रमाची एक्स्प्रेस धावेल का, असा प्रश्न आता केला जात आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान