शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारतीची पुनर्बांधणी कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 17:25 IST

Ulhasnagar : शाळा सुरू झाल्यास मुले कुठे बसणार? असा प्रश्न उपमहापौर भगवान भालेराव यांनी करून, आयुक्तांनी त्वरित निर्णय घेण्याचे सुचविले आहे. 

-   सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिकेच्या रटाळ कारभाराचा फटका शिक्षण विभागाला बसला असून गेल्या ४ वर्षांपासून शाळा क्रं-१८ व २४ च्या इमारत पुनर्बांधणीला मुहूर्त लागला नाही. शाळा सुरू झाल्यास मुले कुठे बसणार? असा प्रश्न उपमहापौर भगवान भालेराव यांनी करून, आयुक्तांनी त्वरित निर्णय घेण्याचे सुचविले आहे. 

उल्हासनगर महापालिकेने जुन्या व धोकादायक झालेल्या शाळा इमारतीची पुनर्बांधणी हाती घेतली. यातून खेमानी परिसरातील शाळा क्रं-१८ व २४ या मराठी व हिंदी शाळेच्या पुनर्बांधणीला हिरवा कंदील मिळाल्यावर, शिक्षण मंडळाने सुरवातीला शेजारील एका खाजगी शाळेत दोन्ही शाळा हलविल्या. मात्र काही राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी शाळा पुनर्बांधणीबाबत प्रश्नचिन्हे उभे केल्याने, इमारत पुनर्बांधणी गेल्या ३ वर्षा पासून रखडली आहे. तसेच महापालिकेच्या मराठी व हिंदी शाळेच्या मुलांना खाजगी शाळेकडे पुरेशी जागा नसल्याचे उघड झाल्यावर, सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली. 

अखेर परिसरातील महापालिका शाळा क्रं-३ मध्ये हिंदी शाळेतील मुलांना हलविले. तर मराठी शाळेतील मुले एका खाजगी शाळेत धडे हिरवू लागले होते. दरम्यान, कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने, मुलांना ऑनलाईन शिक्षण देत असल्याचे बोलले जात आहे. कोरोना महामारीनंतर शाळा सुरू झाल्यास, महापालिका शाळा क्रं-१८ व २४ मधील हजारो मुलांना बसवायचे कुठे?. असा प्रश्न मुलांसह पालकांना पडला आहे.

महापालिकेच्या रटाळ कारभारामुळे हजारो मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून शाळा इमारत बांधणीसाठी उपमहापौर भगवान भालेराव यांनी कंबर कसली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची मागणी भालेराव यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना केली. 

इमारत बांधकाम ठेकेदारांनी सुरवातीला खाजगी शाळा प्रशासनाला महापालिका शाळेला जागा दिल्या बाबत भाडे देत होती. आता त्यांनी भाडे देणे बंद केले. महापालिका आयुक्त दोन्ही शाळेच्या इमारती बाबत का निर्णय घेत नाही. असेही विचारले जात आहे. 

हजारो मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधारात महापालिका आयुक्त यांनी हजारो मुलांच्या शिक्षणाचा विचार करून, शाळा इमारत पुनर्बांधणीला मंजुरी देण्याची मागणी होत आहे. असे न झाल्या मुलांच्या शैक्षणिक भविष्यावर प्रश्नचिन्हे उभे राहणार आहे. शिक्षण विभागाचे उपायुक्त विकास चव्हाण, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी बी एस मोहिते, शिक्षण मंडळाच्या अधिकारी नीलम कदम आदीनाही शाळा पुनर्बांधणी त्वरित होण्याची शक्यता वर्तविली. 

टॅग्स :Schoolशाळाulhasnagarउल्हासनगर