शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाडमध्ये भातखरेदी काट्याला मुहूर्त केव्हा?; शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 23:33 IST

व्यापाऱ्यांकडून कमी भाव 

मुरबाड :  मुरबाड तालुक्यातील भातपिकाला यंदा पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे कर्जाचा डाेंगर असलेल्या शेतकऱ्यांना आधारभूत खरेदी केंद्रे सुरू झाल्यावर आधार मिळेल, अशी आशा आहे. मात्र, खाजगी व्यापारी कवडीमाेल भावात खरेदी करून गेले तरी अद्याप आदिवासी विकास महामंडळाच्या भातखरेदी केंद्राच्या काट्याला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यात आदिवासी विकास महामंडळ दूधनोली व माळ या दोन आदिवासी सेवा सहकारी संस्थांमार्फत भातखरेदी केंद्र सुरू करते. तर, मुरबाड तालुका खरेदी-विक्री संघही शासनाने ठरवून दिलेल्या भावानुसार भातखरेदी करतो. खरेदी-विक्री संघाने मुरबाड येथे केंद्र सुरू केले आहे. 

या ठिकाणी परिसरातील शेतकरी भातविक्रीसाठी आणतात, मात्र टोकावडे ते माळशेजघाट, बांडेशेत, वेळुक या परिसरातील शेतकरी ५० किमी अंतरावर असलेल्या मुरबाडला भात नेऊ शकत नाहीत. त्यांच्या सोयीचे केंद्र माळ आणि धसई ही आदिवासी विकास महामंडळाकडून सुरू केली जातात. ही दोन भातखरेदी केंद्रे सुरू करण्यात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने मेहनतीने पिकवलेला भात धसई, सरळगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने विकावे लागत आहे. 

शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून हाेणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचा जास्त दिवस अंत न पाहता आदिवासी विकास महामंडळाला हमीभावाने भातखरेदी करण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप ठाणे जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष संतोष भांगरथ यांनी केली आहे.

‘अडीच ते तीन हजार हमीभाव द्या’अवकाळी पावसामुळे भातपिकाची नासाडी झाली असली, तरी हाती आलेल्या भातपिकाची विक्री करूनच दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. शासनाने फक्त १८६८ रुपये भाव क्विंटलला जाहीर केला आहे. एक क्विंटल भाताचे पीक घेण्यासाठी कमीतकमी दोन हजारच्या पुढचा खर्च येत आहे. निदान, शासनाने अडीच ते तीन हजार रुपये दर भाताला दिला, तर शेतकरी चिंतामुक्त होईल, अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी