शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सौर उर्जेवर पाणी तापणार कधी?

By admin | Updated: December 12, 2015 01:38 IST

इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका

मीरा रोड : इंधन व वीज बचतीसाठी निवासी इमारती तसेच अन्य इमारतींमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवणे बंधनकारक केलेले असले तरी अशी यंत्रणा कार्यान्वित नसताना महापालिका मात्र सर्रास सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत दाखले देत आहे . अशा खोट्या नाहरकत दाखल्यावर अधिकाऱ्यांचे खिसे मात्र गरम होत आहेत . सौरऊर्जेचा वापरच होत नसल्याने इंधन व वीज बचतीचा शासनाचा हेतू सपशेल अपयशी ठरला आहे. मीरा भार्इंदर नगरपालिका असल्यापासून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये रु ग्णालय , शाळा, महाविद्यालय , हॉस्टेल , हॉटेल, प्रयोगशाळा, कॅन्टीन आदीच्या इमारतीं मध्ये सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात आले कालांतराने शासनाने सर्वच इमारतींना सौर ऊर्जेवर पाणी गरम करण्याची यंत्रणा बंधनकारक केल्याने मीरा भार्इंदर महापालिकेने देखील २००७ पासून बांधकाम परवानगी देताना सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याची अट टाकली . निवासी इमारतीत प्रत्येक सदनिकेस दररोज १००लिटर गरम पाणी मिळेल अश्या क्षमतेची सौर ऊर्जा यंत्रणा बसवणे विकासकास बंधनकारक केले. भोगवटा दाखला घेण्याआधी पालिकेच्या बांधकाम विभागा कडून सौर उर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याचे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते . सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित असल्याच्या दाखल्यांवर २००८-०९ पासून भोगवटा दाखले देण्यास सुरुवात झाली. तेव्हा पासून २०१५पर्यंत बांधकाम विभागाच्या नाहरकत दाखल्यावर तब्बल ४५०भोगवटा दाखले नगररचना विभागाने दिले आहेत . परंतु बहुतांशी इमारतींमध्ये सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वितच नसल्याची धक्कादायक माहिती आहे . निवासी इमारतीवर प्रती सदनिका १०० लिटर प्रमाणे त्या क्षमते नुसार सौर ऊर्जा यंत्रणा गच्चीवर उभारणे आवश्यक आहे . परंतु प्रत्यक्षात खानापूर्ती केली जाते . शिवाय प्रत्येक सदनिकेस गरम पाण्यासाठी स्वतंत्र जोडणी देणे आवश्यक असताना अश्या जोडण्याच दिल्या जात नाहीत . निवासी इमारत व अन्य इमारती मध्ये प्रत्यक्षात सौर ऊर्जेचे पाणी येते का ? क्षमतेनुसार यंत्रणा उभारली आहे का ? या महत्वाच्या बाबी तपासल्याच जात नाहीत . सौर ऊर्जेची यंत्रणाच कार्यान्वित नसल्याने सदनिका धारकांना खर्चिक गिझर वा इंधनाचा वापर करावा लागतो .