शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकुर्ली भाजी मंडईला मुहूर्त कधी? वापराविना धूळखात : ‘मंगलकलश’शेजारील वास्तूत फेरीवाल्यांना जागा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:43 IST

ठाकुर्ली पूर्वेतील मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी बांधलेली तीन हजार चौरस फुटांची वास्तू वापराविना धूळखात पडून आहे.

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी बांधलेली तीन हजार चौरस फुटांची वास्तू वापराविना धूळखात पडून आहे. ठाकुर्ली शहराचा वाढता विस्तार पाहता ही मंडई सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रेल्वेस्थानक परिसर व मुख्य बाजारपेठेतील फेरीवाल्यांना येथे स्थलांतरित केल्यास हा परिसर फेरीवालामुक्त होईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेने मंगलकलश सोसायटीशेजारी भाजी मंडईसाठी आरक्षण ठेवले होते. त्यामुळे विकासकाने सोसायटी विकसित करताना भाजी मंडई बांधून दिली. तळ अधिक एक मजली अशी तीन हजार चौरस फुटांची वास्तू अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहे, अशी माहिती रहिवासी राजू शेख यांनी दिली. ठाकुर्लीचा विस्तार झपाट्याने होत आहे. असे असतानाही रहिवाशांना भाजीखरेदीसाठी ठाकुर्लीतील बँक परिसर, रेल्वेस्थानक परिसरातील मुख्य बाजारपेठ अथवा डोंबिवलीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे ठाकुर्लीतील मंडई सुरू करण्याची मागणी होत आहे. एकाच वास्तूच्या मंडईत भाजीविक्री सुरू झाल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. नागरिकांचा डोंबिवलीपर्यंत जाण्याचा वेळ आणि त्रासही वाचेल. तसेच ठाकुर्ली फेरीवालामुक्त होण्यास मदत होईल. ठाकुर्लीतील समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याच्या परिसरातही मंडई बांधण्याचीही मागणी जोर धरत आहे.ठाकुर्ली, खंबाळपाडा परिसरात मंडई उभारण्यासाठी भाजपाचे दिवंगत नगरसेवक शिवाजी शेलार यांनी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने पत्रव्यवहार केला होता. विद्यमान नगरसेवक साई शेलार हे देखील प्रयत्न करत आहेत. पण, नेमकी अडचण कुठे आहे, हे समजत नसल्याने समस्या जास्त गंभीर होत आहे.उपद्रवींचा त्रास -मंडईची वास्तू पडून असल्याने तेथे रहिवाशांचे लक्ष नसते. त्याचा फायदा उपद्रवी व्यक्तींकडून घेतला जात आहे. रात्रीच्या वेळी तेथील अंधाराचा फायदा मद्यपी घेतात. अनेकांनी त्या वास्तूच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. काहींनी वास्तूमध्ये उपद्रव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सोसायटीची सुरक्षा धोक्यात आली होती. आता सोसायटीत पूर्णवेळ सुरक्षारक्षक आहेत, पण तरीही त्यांची नजर चुकवून काही उपद्रवी तेथे जातातच. त्यांना कसे थांबवणार. रात्रीच्या वेळी अंधारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मंडई सुरू करण्यामागील नेमकी अडचण काय आहे, हे तरी महापालिकेने स्पष्ट करावे. भाजी मंडईसाठी इमारत उभारल्याने त्याचा त्यासाठीच वापर व्हावा, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.