शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात डॉन दाऊदच्या भावाला छातीत कळ येते तेंव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:51 IST

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासरकरच्या छातीत कळ आणि आणि चक्कर आल्यामुळे कोणताही धोका न पत्करता ठाणे जिल्हा रुग्णालयाने त्याला मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात पाठविले.

ठळक मुद्देठाण्यातून मुंबईत आलेल्या कासकरवर तातडीने उपचार जिल्हा रुग्णालयाने पाठविले मुंबईतखंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याला सोमवारी रात्री मुंबईतील सर जमशेदजी जीजीभॉय (जे.जे.) रुग्णालयात दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला पुन्हा ठाण्याच्या कारागृहात पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.एका खंडणीच्या गुन्ह्यात कासकर सध्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. २७ मे रोजी त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार कारागृहातील अधिकाऱ्यांकडे केली होती. सुरुवातीला त्याला कारागृहातील वैद्यकीय अधिकाºयांनी तपासल्यानंतर ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, तिथेही प्रकृतीत सुधारणा नसल्याची त्याने तक्रार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने त्याला मुंबईच्या सर जे.जे. रुग्णालयात सोमवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पाठवले होते. जे.जे.मध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्यावर हृदयाशी संबंधित सर्व तपासण्या करून तसे उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तामध्ये पुन्हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात आणल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘‘रविवारी रात्री इकबालची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या सल्ल्यानुसार त्याला जे.जे. रुग्णालयात पाठवले होते. आता त्याची प्रकृती चांगली आहे.’’नितीन वायचळ, अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे..........‘‘ठाणे जिल्हा रुग्णालयातून आलेल्या ५६ वर्षीय इकबाल कासकरला छातीत दुखण्याच्या तसेच चक्कर येण्याच्या तक्रारीवरून २८ मे रोजी रात्री दाखल करण्यात आले होते. तपासणी आणि उपचाराअंती प्रकृती सुधारल्यानंतर त्याला २९ मे रोजी पहाटे डिस्चार्ज करण्यात आला आहे.डॉ. संजय सुरासे, अधीक्षक, सर जे.जे. रुग्णालय, मुंबई

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाunderworldगुन्हेगारी जगत