शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

काेराेनाने मला काय शिकवलं... डाेळ्यांनी न दिसणाऱ्या काेराेनाने उघडले सर्वांचे डाेळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:36 IST

सर्वांची झोप उडवून गेला. सगळीकडे हाहाकार माजला काेराेनाने धुमाकूळ घातला मास्कविना जगणे असह्य झाले काेराेनाने भय निर्माण केले.’ काेराेना ...

सर्वांची झोप उडवून गेला.

सगळीकडे हाहाकार माजला

काेराेनाने धुमाकूळ घातला

मास्कविना जगणे असह्य झाले

काेराेनाने भय निर्माण केले.’

काेराेना काेराना काेराेना... कधीही एकिवात न असणारा विषाणू संपूर्ण जगभरात पसरला आणि संपूर्ण मानवजातीचे अस्तित्व संकटात आले. डाेळ्यांनी न दिसणाऱ्या या विषाणूने हाहाकार माजवला. चीनमध्ये निर्माण झालेला हा विषाणू भारतात वणव्यासारखा पसरला आणि संपूर्ण मानवजात ही संकटाच्या खाईत ढकलली गेली.

२३ मार्च २०२० पासून लाॅकडऊन सुरू झाले. कधीही अशा परिस्थितीचा सामना न करणारे तुम्ही आम्ही अचानक घरात कैद झालाे. मुुंबईसारख्या शहरात सतत कामात असणारे चाकरमानी स्तब्ध झाले. अचानक कामाचा वेग चक्क ब्रेक लागल्यासारखा एकदमच थांबला. प्रत्येक जण घरात अडकून पडला. सगळीकडे संचारबंदी सुरू झाली. फक्त जीवनावश्यक वस्तूच तेवढ्या मिळायला लागल्या. यासाठी सर्वांचा संघर्ष सुरू झाला. गरीब लाेकांचे खूपच हाल झाले. हातावर पाेट असणारे लाेेक आपल्या मूळ गावी जायला निघाले. बस, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद झाली, तरी लाेक खासगी वाहनाने तर काेणी चक्क पायीच कुटुंबातील सदस्यांना घेऊन मार्गक्रमण करायला निघाले. लाेकांचे खूप हाल झाले. मात्र, म्हणतात ना माणुसकी कुठे तरी शिल्लक आहे. अनेक लाेकांच्या कार्यामुळे त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडले. अनेक सामाजिक संस्थांनी गरजू लाेकांना धान्यवाटप केले. त्यांची राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. आपण चित्रपटात पाहताे की, संकटात हिराे कशी लाेकांची मदत करताे; पण आता पडद्यावर खलनायकाची भूमिका करणारा साेनू सूदसारखा अभिनेता प्रत्यक्ष जीवनात सर्वांसाठी हिराे ठरला. परगावी जाणाऱ्या लाेकांसाठी त्याने स्वत: खाजगी वाहने उपलब्ध करून दिल्याने लाेकांनी त्याला देवासारखे पुजले. माणसांतच देव आहे आणि संकटात जाे धावून येताे ताेच खरा माणूस हाेय. देवाची प्रचीती येण्यासाठी मंदिरात जायची गरज नाही. देव तर माणसातच आहे.

या काेराेनाने आपल्याला खूप काही शिकवले. घरात एकमेकांसाठी भरपूर वेळ द्यायला शिकवले. घरातील कर्तापुरुष, तसेच आईदेखील नाेकरी करत असतील, तर अशा कुटुंबातील माता-पित्यांना आपल्या मुलांसाठी भरपूर वेळ मिळाला. त्यांचे छंद, आवडी-निवडी जाेपासल्या गेल्या. मीदेखील एक शिक्षिका आहे. नाेकरीनिमित्त बराचसा वेळ कुटुंबाला देता येत नव्हता. मात्र, या लाॅकडाऊनमध्ये मला माझ्या मुलांसाठी वेळ देता आला. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काेणती ना काेणती कला असते आणि या निमित्ताने त्या कलेला वाव मिळला. काेराेना काळात साेसायटीतील लाेकदेखील कुटुंबाप्रमाणे वाटायला लागले. आमच्या साेसायटीतदेखील या काळात काेकणातील लाेकांनी गावाहून आंब्याच्या पेट्या सर्वांसाठी मागवल्या. फळे, भाज्या, किराणा, औषधेदेखील उपलब्ध करून देण्याचे काम प्रत्येकाने केले. काेणतेही काम कमी न लेखता काेणी भाजीपाल्याचा व्यवसाय तर काेणी पापड, लाेणची बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. मुख्य म्हणजे ऑनलाइन बऱ्याचशा गाेष्टी यामुळे शिकायला मिळाल्या. माेबाइल सर्वांचा अत्यंत जवळचा मित्र बनला. आता माेबाइलचे फायदे व ताेटे दाेन्ही आहेत. मात्र, हाच माेबाइल सर्वांचा जिवलग असा मित्र बनला.

या काळात मला समजले की, फक्त रक्ताचे नातेवाईक आपल्या जवळचे नसतात, तर माणुसकीचे नाते त्याहून महान असते. आपल्या आजूबाजूला नीट पाहिले तर खराेखरच आपल्या नातेवाइकांपेक्षा जास्त जवळचे आपले शेजारी आणि परिसरातील लाेक असतात. काेराेनाने माणसे एकमेकांपासून दूर जाऊ लागली तरी मनाने ती अगदी जवळ आली. याकाळात सर्वांना माेठा धडा मिळाला असेल तर ताे स्वच्छतेचा. एकमेकांपासून सुरक्षित अंतर, वारंवार हात धुण्याची सवय, मास्क लावणे, गर्दी टाळणे यामुळे सर्वत्र स्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले. लाेक घरातच असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि त्यातूनच हवेचे प्रदूषण अल्प झाले. नद्यांचे पाणी स्वच्छ झाले. म्हणजे माणसे घरात काेंडल्यामुळे बाहेरचा परिसर स्वच्छ झाला. प्रदूषण कमी झाले. ध्वनी प्रदूषण कमी झाले. स्वच्छतेचे महत्त्व आपणा सर्वांना काेराेना शिकवून गेला.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना लाेक आधी मनाप्रमाणे वागत हाेते. काेठेही थुंकणे, कचरा करणे, गर्दी करणे; मात्र काेराेनाने लाेकांना जगण्यासाठी सामाजिक भान ठेवणे किती गरजेचे असते, ते शिकवले. मास्क घातल्याने एकापासून दुसऱ्याला आजाराची बाधा हाेणे कमी झाले. गर्दी कमी झाल्यामुळे लाेकांना शिस्तीचे महत्त्व कळायला लागले. सार्वजिनक ठिकाणी कसे वागावे, हे लाेकांना समजू लागले. सॅनिटायझरचा वापर केल्यामुळे या विषाणूचा संसर्ग राेखण्यास आपण यशस्वी ठरलाे.

काेराेनाने आपल्याला एक महत्त्वाची गाेष्ट शिकवली की, माणसाला जगण्यासाठी फक्त अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गाेष्टींचीच खरी गरज असते. मात्र, आपण चैनीच्या नावाखाली खूप काही गाेष्टींवर विनाकारण पैसे घालवत असताे.

काेराेनावर आता लस उपलब्ध झाली आहे आणि काही काळातच ताे हद्दपार हाेईल. मात्र, ताे जाताना आपल्याला खूप काही शिकवून जाईल. पुढच्या पिढीला आपण ‘न भूताे न भविष्यती’ अशा या काेराना काळातील कथा सांगण्यात मग्न असू. डाेळ्यांनी न दिसणाऱ्या काेराेनाने आपणा सर्वांचे डाेळे उघडले आहेत. त्याला आपण आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही.

‘काेराेना तू शिकवलास सर्वांना स्वच्छतेचा धडा

मात्र, तू आलास आणि सर्वांच्या डाेळ्यांच्या पाणवल्या कडा,

किती दिवस देशील आम्हा सर्वांना सजा

करू दे माझ्या विद्यार्थ्यांना शाळेत येऊन मजा

आता तरी बाबा तू एकदाचा निघून जा

तुला करते मी विनंती परत फिरून जा.’

- साै. वर्षा राठाेड, सहशिक्षिका, कल्याण