शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता, २५ किमीच्या ठाणे मेट्रोवर २२ स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 05:25 IST

लवकरच सल्लागाराची नेमणूक : दीड हजार कोटींचा खर्च, महासभेसमोर प्रस्ताव

ठाणे : मुंबई-ठाणे मेट्रोच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आता अंतर्गत भागातही मेट्रोच्या हालचाली पालिकेने सुरू केल्या आहेत. यासाठी ती राज्य शासन, केंद्र शासनाच्या निधीसोबतच जर्मन बँकेची मदत घेणार आहे. या कामासाठी सुमारे १५०० कोटींचा खर्च अपेक्षित असून या २५ किमीच्या या मार्गावर २२ स्थानके असणार आहेत. त्यानुसार, तो सोयीस्कर आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडावा, या उद्देशाने ठाणे महापालिकेने त्यासाठी सल्लागार नेमण्याची तयारी सुरू केली असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.

अंतर्गत मेट्रोसाठी नवीन रेल्वेस्टेशनपासून मॉडेला चौक, मेन रोड वागळे, रोड नं. २२, लोकमान्यनगर टीएमटी डेपो, देवदयानगर, शास्त्रीनगर, उपवन तलाव, पोखरण रोड नं. २, गांधीनगर जलकुंभ, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह यासह संपूर्ण शहरास फायदेशीर ठरेल, अशी मार्गिका निश्चित केली आहे. या मार्गिकेत २२ स्थानके असणार आहेत.केंद्राच्या मंजुरीनंतरच कामाला सुरुवातया मार्गाला चालना देण्यासाठी आता पालिकेने यासाठी सल्लागार नेमण्याची तयारी सुरू केली आहे. या सल्लागाराकडून या मेट्रोचा फिजिबिलिटी रिपोर्ट तयार केला जाणार आहे. त्यानंतर, हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्राकडे पाठवला जाणार आहे. केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला चालना मिळणार आहे.एक हजाराहून अधिक बांधकामे बाधित होणारपूर्वी ज्या पद्धतीने रिंग रूटचा मार्ग तयार केला होता, तसाच हा मार्ग असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मार्गात असलेली सुमारे एक हजाराहून अधिक बांधकामे बाधित होणार आहेत. सुरुवातीच्या स्थानकापासून ३० मीटर खाली म्हणजेच सिडको ते नवीन रेल्वेस्टेशनपर्यंतचा या मेट्रोचा मार्ग हा भुयारी असणार आहे. त्यापुढील मार्ग हा रस्त्याच्या वरून असणार आहे. ठाणे स्टेशनपासून ही मेट्रो बाहेर पडणार आहे.जर्मन बँकेचे कर्ज घेणारअंतर्गत मेट्रोसाठी सुमारे १५०० कोटींचा खर्च पालिकेने अपेक्षित धरला आहे. या खर्चासाठी राज्य शासन, केंद्र शासनाकडेदेखील निधी मागितला जाणार आहे. तसेच जर्मन बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी जर्मन बँकेचे प्रतिनिधी पालिकेत येऊन गेले असून त्यांनी या मार्गाची पाहणी केली असून हा मार्ग किफायतशीर आहे किंवा नाही, याची चाचपणी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका