शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण संस्थेच्या सार्वजनिक जागेवर बेकायदा बांधकाम; कारवाईसाठी पालिकेचे किती उंबरठे झिझवायचे: रहिवाशांचा सवाल

By धीरज परब | Updated: June 29, 2024 09:10 IST

एकाच जावक क्रमांकावर दोन वेदरशेड परवानगी.

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील जागा ही मोकळी ठेवण्याऐवजी त्यावर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याच्या तक्रारीवर आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही अधिकारी कारवाई करत नाही . रहिवाशांच्या न्यायासाठी पालिकेचे किती वर्ष उंबरठे झिजवायचे ? असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे . 

मीरारोडच्या शांतिपार्क येथील श्री साई प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्था गृहसंकुल आहे . सदर इमारतीत डॉन बॉस्को शाळा आहे . येथील रहिवाश्यांच्या गृहनिर्माण संस्थेने शाळेच्या चालकांनी बेकायदा बदल केला. बेकायदा जिना , कार्यालय , गेट आणि भलीमोठी पत्रा शेड बनवून सार्वजनिक सोसायटीची जागा बळकावल्याची तक्रार केली होती . तर पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी ६ जून रोजी शाळेच्या चालकास वेदरशेड ची परवानगी रद्द केल्याचे व शेड २४ तासात काढून  टाकण्याची नोटीस दिली . 

विशेष म्हणजे एकाच जावक क्रमांकावर दोन परवानग्या दिल्या गेल्याची बाब देखील रहिवाश्यांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली . रहिवाश्यांनी जून महिन्यात अनेकदा महापालिका मुख्यालयात उपायुक्त रवी पवार सह आयुक्त संजय काटकर यांना लेखी तक्रार देत गृहसंकुलातल्या शाळा संचालकांनी केलेल्या अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामावर कारवाईची मागणी केली . या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करावा असे रहिवाश्यांचे म्हणणे आहे . सदनिकां मध्ये बदल करून शाळा कशी काय चालवली जाते ? मुलांच्या जीवाशी खेळ न करता नियम निकष नुसार योग्य ठिकाणी शाळा असावी असे अनेक नागरिक सांगतात . 

पोलिसां कडे देखील रहिवाश्यांनी तक्रारी केल्या आहेत . तर महापालिकेने गृहसंकुलात केलेल्या ह्या बेकायदा बांधकाम प्रकरणी ठोस तोडक कारवाई करण्यास टाळाटाळ चालवली असून सामान्य रहिवाश्याना त्यांच्या न्याय हक्का साठी पालिकेचे आणखी किती वर्ष उंबरठे झिजवायला लागणार आहेत ? असा सवाल केला आहे .  ६ जून रोजी शेड २४ तासात काढण्याची नोटीस दिली तर आज २८ जून उजाडला तरी पालिकेने येथील बेकायदा बांधकामां वर कारवाई केली नाही . येथे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदार पालिकेची असेल असा आरोप रहिवाशी यांनी केला आहे .  

महापालिका उपायुक्त रवी पवार यांनी सांगितले कि, शेड काढून टाकण्याची नोटीस दिली आहे . शाळेतील मुलांच्या वेळे व्यतिरिक्त अन्य दिवस निश्चित करून लवकरच बेकायदा कामांवर कारवाई केली जाईल . ह्या बाबत आयुक्त यांच्याशी चर्चा झाली आहे  . 

टॅग्स :mira roadमीरा रोड