शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

टंचाईच्या काळात विहिरींचा आधार

By admin | Updated: March 14, 2016 01:47 IST

पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे.

भार्इंदर : पाणीकपातीमुळे शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाल्याचा परिणाम शहरभर दिसत आहे. तर, आठवड्यातील तीन दिवस असलेल्या ठणठणाटाला दुर्लक्षित विहिरींचा आधार नागरिकांनी घेतला आहे. आॅक्टोबर २०१५ पासून ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. यंदा त्यात वाढ झाली आहे. शहरासाठी पाण्याचा नवा स्रोत नसल्याने त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. या कपातीमुळे आठवड्यातून केवळ चार दिवसच पाणीपुरवठा होत आहे. दोन वर्षांपूर्वी पालिका हद्दीतील जलसाठ्याचा वापर करण्याचा विचार प्रशासनस्तरावर सुरू झाल्यानंतर त्याला काही अधिकाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्याची नितांत आवश्यकता यंदा जाणवू लागली आहे. शहरात सुमारे डझनभर सार्वजनिक विहिरी, ११ तलाव असा सहज उपलब्ध होणार जलसाठा आहे. शिवाय, मर्गाळी तलाव व चेना नदीचे अस्तित्व आहे. यातील मर्गाळी तलाव सध्या एमएमआरडीएच्या विशेष पर्यटन क्षेत्राच्या हद्दीत गेल्याने पालिका हद्दीत असलेल्या चेना नदीतील पाणी टँकरद्वारे उपसा करून ते पिण्याखेरीज इतर वापराकरिता देण्यासाठी तत्कालीन आयुक्त सुरेश काकाणी यांनी निविदा प्रक्रिया सुरू केली होती. परंतु, हे पाणी उपसणे अव्यवहार्य असल्याचा फतवा काढून त्याला प्रतिसादच मिळाला नसल्याचे कारण अधिकऱ्यांनीच पुढे केल्याने ती प्रक्रिया बासनात गुंडाळली आहे. शहरात असलेल्या सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्या नागरिकांच्या वापरासाठी खुल्या करण्याचे आदेश देऊनही त्याकडे आजतागायत दुर्लक्ष केले आहे. परंतु, याच विहिरी ऐन कपातीच्या काळात नागरिकांना आशेचा किरण ठरत आहेत. स्टेम व एमआयडीसीने गुरुवार ते शनिवारदरम्यान शहराला पाणीपुरवठा केलेला नाही. त्यामुळे शहरातील सर्वच नळ कोरडे पडल्याने नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे नागरिकांनी थेट सार्वजनिक व खाजगी विहिरींकडे मोर्चा वळवून गरज भागवली. जोपर्यंत कपात लागू आहे, तोपर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरी स्वच्छ करून त्यातील पाणीकपातीच्या काळात द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.