शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

टिटवाळ्यात पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:43 IST

चार दिवसांपासून नागरिकांचे हाल : मोहोली उदंचन केंद्रातील यंत्रणा अद्याप नादुरुस्त

टिटवाळा : कल्याण तालुक्यात शुक्रवारी आणि शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे केडीएमसीचे मोहिली उदंचन केंद्र पाणीखाली गेले होते. त्यामुळे या केंद्रांतून तसेच मोहने सबपंप हाउसमधून कल्याण-डोंबिवली शहरांना दोन दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. रविवार सायंकाळनंतर कल्याण-डोंबिवलीचा पुरवठा सुरळीत झाला. मात्र, केडीएमसीतील भाग असलेल्या टिटवाळा शहर आणि परिसराला चार दिवस झाले तरी अजूनही या केंद्रांतून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. परिणामी येथील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

केडीएमसीच्या ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील मोहिली उदंचन केंद्रातून १०० एमएलडी पाणी उचलून व शुद्धीकरण करून मांडा, टिटवाळा, बल्याणी, मोहने, मोहोली, उंभार्णी, गाळेगाव, मोहने, फुलेनगर, वडवली, अटाळी व आंबिवली येथे पुरवले जाते. परंतु, शुक्र वारी झालेल्या पावसामुळे जलशुद्धीकरण केंद्र दोन दिवस पाण्याखाली होते. यामुळे तेथील पाणी शुद्ध व पाणीपुरवठा करणारी सर्व यंत्रसामग्री व पंपहाउस नादुरु स्त झाले आहेत. यामुळे चार दिवसांपासून टिटवाळा परिसरातील हजारो नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले आहे. ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने नागरिक प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत. केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी चार दिवसांपासून जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रसामग्री व पंपहाउस दुरु स्त करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. परंतु, त्यांना काही यश येत नाही. एक बिघाडदुरु स्त केला की दुसरा बिघाड होत असल्याने अक्षरश: कर्मचारी व अधिकारी चार दिवसांपासून हैराण झाले आहेत.दरम्यान, चार दिवसांपासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त आहोत. केडीएमसी प्रशासनाने पर्यायी व्यवस्थापक म्हणून टँकरद्वारे तरी पिण्याच्या पाणीपुरवठा करायला हवा होता. आम्ही चार दिवसांपासून विकत घेऊन पाणी पित आहोत. काही नागरिक अक्षरश: पावसाचे पाणी गाळ व गरम करून वापरत आहेत, असे टिटवाळा येथील रहिवासी नीलेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.चार दिवसांपासून मी मोहिली येथील उदंचन केंद्रांवर जाऊन पाहणी करत आहे. पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करून पुराच्या पाण्यामुळे नादुरु स्त झालेली यंत्रसामग्री दुरु स्त करण्याचे काम करत आहेत.- उपेक्षा भोईर, उपमहापौरदोन दिवस संपूर्ण पंपहाउस, उदंचन केंद्र व जलशुद्धीकरण केंद पुराच्या पाण्यात होते. यामुळे येथील सर्व मशनरी, पंप हाउस नादुरु स्त झाली आहे. एक बिघाड दुरु स्त केला की दुसरा बिघाड पुढे उभा राहतो. लवकरच आम्ही हा बिघाड दुरुस्त करून सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंगळवारी रात्रीपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.- उदय सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता, ‘अ’ प्रभाग क्षेत्र

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी