शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळे शाळांच्या मुळावर, लगाम घालण्यासाठी भाडेवाढीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:56 IST

ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचे धडे देण्याचा निर्धार करणा-या ठाणे महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता

ठाणे : ठाणे शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असताना आणि विद्यार्थ्यांना डिजिटलचे धडे देण्याचा निर्धार करणा-या ठाणे महापालिकेला आपल्याच शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता, मुख्याध्यापक नसणे, त्यांची झालेली दुरवस्था या बाबींकडे लक्ष द्यायला वेळ नाही का, असा सवाल महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुरुवारच्या महासभेत प्रशासनाला केला. शिवाय, या शाळा आणि मैदानांमध्ये सवलतीच्या दरात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यांमुळे त्यांची अवस्था फारच बिकट झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. त्यामुळे अशा सोहळ्यांना लगाम घालण्यासाठी भाड्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिक्षण विभागाच्या वतीने व्हर्च्युअल क्लास रूम आणि डिजिटल शिक्षणाचे धडे यासंदर्भातील विषय चर्चेला आला असता, अनेक सदस्यांनी महापालिका शाळांच्या दयनीय अवस्थेचे पाढे वाचले. विद्यार्थ्यांची घसरती पटसंख्या ही चिंतेची बाब असून मनपा शिक्षकांबरोबरच ८० टक्के शाळांमध्ये मुख्याध्यापकच नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याचे मत विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. तर, कोपरीतील शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याचा मुद्दा मालती पाटील यांनी उपस्थित केला. शाळांमध्ये संगणक आहेत, परंतु ते दुरुस्त केले जात नाहीत. हायटेक प्रणालीची भाषा आपण करतो. परंतु, अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधाच नसल्याची बाब या वेळी सदस्यांनी निदर्शनास आणली. शाळा क्रमांक १८ मध्ये तर आठवीचा वर्ग बंद करून त्यांना खुराड्यात हलवण्यात आल्याचा मुद्दा विकास रेपाळे यांनी उपस्थित केला. दिव्यातील शाळेत पटसंख्या जास्त असतांनादेखील तिचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून अपूर्ण असल्याची खंत राष्टÑवादीचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी व्यक्त केली. पंखे बंद, लाइट नाही, शौचालयांची अवस्था बिकट अशा परिस्थितीत हे शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देणार तरी कसे, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला.दरम्यान, ढोकाळी येथील महापालिकेच्या शाळेत तर हळदीचा सोहळा रंगला होता. त्यामध्ये मारामारी झाली आणि काहींनी या शाळेतील बेंचेस, लाइट आणि इतर साहित्य तोडल्याचा आरोप दस्तुरखुद्द महापौरांनी केला.