शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वेबसीरिज चित्रणादरम्यान मारहाण; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 04:01 IST

गायमुखच्या घटनेत एक फरार; पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप

ठाणे : वेबसीरिजच्या चित्रणादरम्यान शूटिंगस्थळी आलेल्या चौघांनी बेकायदेशीर जमाव करून सेटवरील संतोष तुंडेल, सोहम शहा आणि उदित पेडणेकर या तिघांना बांबूने बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली. त्यामध्ये संतोषच्या डोक्याला दुखापत झाली आहे. तसेच शूटिंगच्या व्हॅनिटी व्हॅनची काच फोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुरुवारी दुपारी तिघांना अटक केली. यातील एक जण फरार असून अटकेतील तिघांना २४ जूनपर्यंत कोठडी मिळाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.याचदरम्यान मारहाणीनंतर कलाकार मंडळीने व्हायरल केलेल्या व्हिडीओत पोलिसांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. परंतु, पोलिसांनी त्या आरोपाचे खंडण करून ज्यांनी मागणी केली, त्याच्याबाबत तक्रार करा. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी सांगितले.या मारहाणीप्रकरणी केलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर गुरुवारी दुपारी भार्इंदर पूर्व येथील कृष्णा अमरसिंग सोनार (३४), पालघरातील सोनू वीरेंद्र दास (२४) आणि भार्इंदर पूर्वेकडील सुरज महेंद्रनाथ शर्मा (२९) अशा तिघांना अटक केली. त्यानंतर, ठाणे न्यायालयात हजर केल्यावर त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तसेच फरार रोहित गुप्ता आणि अनोळखी व्यक्तीचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. तसेच शूटिंगची कोणतीही परवानगी घेतली नव्हती आणि याबाबत संबंधितांनी पोलिसांनाही कळवले नसल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी सांगितले.गायमुख येथे गर्दी झाल्याचे समजल्यावर पोलीस तेथे गेले. त्यावेळी एक जण साहित्याची आवराआवर करत होता. तसेच शूटिंग करणारे कलाकार तेथून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काही कलाकारांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांनीच त्या आलेल्या लोकांना मारहाण करण्यास सांगितले. तसेच पैशांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. तो चुकीचा असून ज्यांनी मागणी केली, त्याची माहिती द्यावी, यासाठी त्यांना फोन करून बोलवून घेतले. त्यानंतर, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनीष पोटे पुढील तपास करत आहेत.अशी घडली घटनागोरेगाव येथे राहणारे आणि प्रॉडक्शन डायरेक्टर असलेले इम्पल आहुजा (३७) यांनी दिलेल्या तक्रारीत घोडबंदर रोडवरील गायमुख येथील एका बंद कंपनीत फिक्सर या वेबसीरिजचे शूटिंग चालू होते. त्यावेळी एकास्पॉट एजन्सीची काही मंडळी तेथे आली. त्यांनी बेकायदेशीर लोक जमवून काही कारण नसताना कलाकारांना बांबूने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शूटिंगसाठी लावलेल्या कॅमेऱ्याला धक्का देऊन तो खाली पाडला. तसेच व्हॅनची काच फोडून तिचे नुकसान केले.