शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

'भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा आम्हीच जिंकू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:09 IST

पालकमंत्र्यांचा निर्धार; कपिल पाटील यांचा भिवंडीत सत्कार

भिवंडी : लोकसभेच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील चारही जागा जिंकून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी इतिहास घडविला. आता तोच कल कायम ठेवून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघावर विजय मिळवू, असा निर्धार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी येथे व्यक्त केला.तालुक्यातील वळ येथे खासदार कपिल पाटील यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, ज्योती ठाकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, आमदार गणपत गायकवाड, रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, नरेंद्र पवार, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, जगन्नाथ पाटील, पंचायत समितीच्या सभापती रवीना जाधव, विश्वास थळे, महेंद्र गायकवाड, मदनबुवा नाईक, देवानंद थळे, संतोष शेट्टी, दयानंद चोरघे आदी उपस्थित होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुतीने एकत्र लढवाव्यात. त्यातून कार्यकर्त्यांमधील कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या मोठ्या कुटुंबात मतभेद होतात. पण काही काळानंतर सर्व एकत्र येतात. त्याच धर्तीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महायुतीचे कार्य केले. आता खासदार पाटील यांची जबाबदारी वाढली असून, तीन खासदारांनी एकत्र येऊन केंद्रातील विविध प्रकल्प राबवून विकास करावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.भिवंडीतील दोन मतदारसंघात महायुतीला मिळालेली मतांची पिछाडी भरून काढण्यासाठी एक दिलाने काम करावे लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन खासदार पाटील यांनी केले. कल्याण-मुरबाड रेल्वे, कल्याण-मुरबाड रस्ता आणि माळशेज घाटात बोगदा आदी कामे सुरू करण्याचा प्रयत्न आहे.कार्यकर्त्यांचे सर्जिकल स्ट्राइकलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात व्हॉट्सअ‍ॅपवर खोटे मेसेज व्हायरल केले जात होते. मतदानाच्या दिवशीही थेट जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नावाने मेसेज व्हायरल झाला होता. मात्र, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी थेट सर्जिकल स्ट्राइक करून विजय मिळवून दिला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाShiv Senaशिवसेना