शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

"जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 13:31 IST

ते केवळ ठाणे पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून एक थोर समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे पहिले पाहिजे अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली.

नितीन पंडितभिवंडी: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार बरोबरच इतर राजकीय पक्ष, संघटना व स्थानिक भूमिपुत्र सकारात्मक असतानाही केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असून विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल व वेळकाढू पणा करत आहे. मात्र जोपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यात येत नाही तोपर्यंत या विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोकनेते स्व.दि.बा.यांचे समाज कार्य केवळ नवी मुंबई किंवा ठाणे पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नव्हते तर दि.बा.पाटील यांच्यामुळे देशात स्त्री भ्रूण हत्या कायदा पारीत झाला. प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन अथवा भरीव मोबदला देण्याचे कार्य देखील त्यांनी केले. देश स्वातंत्र्यापूर्वी त्यांनी कुळ कायदा करण्यासाठी इंग्रजांविरोधात आंदोलन केले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली होती,देश स्वातंत्र्यानंतर कुळ कायदा मंजूर झाला ज्याचा फायदा आज देशातील सर्व शेतकऱ्यांना होत आहे. ओबीसी आरक्षणासाठी देखील दि.बा.पाटील यांचे मोठे योगदान आहे. दि.बा.पाटील हे पाच वेळा आमदार,दोन वेळा खासदार,राज्याच्या विधान सभेचे विरोधी पक्षनेते असा त्यांचा राजकीय,सामाजिक व कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. ते केवळ ठाणे पालघर जिल्ह्यापुरती मर्यादित नसून एक थोर समाज सुधारक म्हणून त्यांच्याकडे पहिले पाहिजे आणि त्यासाठीच नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव द्यावे अशी आमची मागणी असल्याची माहिती खा.बाळ्या मामा यांनी दिली आहे.

रविवारी १४ सप्टेंबर रोजी लोकनेते स्व.दि.बा.पाटील यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव मिळावे यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गाव अशी भव्य कार रॅली काढण्यात आली असून या कार रॅलीत किमान दोन हजारांहून अधिक चार चाकी गाड्या असणार आहेत.या कार रॅलीत ठाणे,पालघर,रायगड,नवी मुंबई,मुंबई येथून हजारोंच्या संख्येने आगरी कोळी बांधव उपस्थित राहणार आहेत.हि कार रॅली केंद्र सरकारला जागे करण्यासाठी असणार असून हा केवळ ट्रेलर आहे, आम्हाला पिच्चर दाखवायला भाग पाडू नका,जो पर्यंत विमानतळाला नाव देणार नाही तो पर्यंत विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही असा इशारा देखील खासदार बाळ्या मामा यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ