शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

काश्मीरसह पाकिस्तानही हवाय, बाळासाहेबांसारखीच भूमिका बजावा; जैन धर्मगुरूंचं राज ठाकरेंना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 12:20 IST

जैन मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून ठाण्यातील जैन मंदिरामध्ये आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांनी मंदिरातील जैन धर्मगुरूंशी संवाद साधला. यावेळी काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच भूमिका तुम्ही बजावा, असे आवाहन जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले आहे. 

ठाणे येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये शनिवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान मंदिरात राज ठाकरे यांनी जैन धर्मगुरु श्रीमद विजय नित्यानंद सुरीषवर्जी म .सा. यांच्याशी चर्चा केली. यावेळी तुमच्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसते, आम्हाला अखंड भारत पाहिजे, काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता, बाळासाहेबांनी जशी भूमिका बजावली तशी भूमिका तुम्ही बजावा, बाळासाहेबांसारख्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत, असे आवाहन  जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले. 

दरम्यान, राज ठाकरे यांचा महिन्याभरातील ठाण्याचा दुसरा दौरा आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी ठाण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जैन मंदिरातील कार्यक्रम पार पडल्यानंतर राज ठाकरे हे शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून त्यांच्या या भेटी खासगी असणार आहेत. यानंतर ते ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, ठाणे येथील टेंभीनाका परिसरात शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कार्यालय असून येथून आता बा‌ळासाहेबांची शिवसेना या गटाचे कामकाज चालते. त्यामुळे टेंभीनाका परिसर हा संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. याच भागात जैन समाज मोठ्या प्रमाणात राहत असून या समाजाचे या भागात हे मंदिर आहे.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेthaneठाणेJain Templeजैन मंदीर