शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आपण लोकशाही मार्गाने लढलो, सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदे

By अजित मांडके | Updated: February 17, 2023 21:10 IST

'आम्ही जो निर्णय घेतला, तो सर्वांना मान्य होता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक जोडली गेली.'

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर ठाण्यात आनंद आश्रम येथे एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत हा जल्लोष साजरा केला.

शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यावरून मागील चार ते पाच महिने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वाद सुरू होता अखेर शुक्रवारी सायंकाळी शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आलं त्यानंतर ठाण्यात विविध ठिकाणी शिंदे गटाकडून एकच जल्लोष करण्यात आला आनंद दिघे यांचा आनंद आश्रम या ठिकाणी सायंकाळी शिवसेना जिंदाबाद एकनाथ शिंदे जिंदाबाद अशा प्रकारच्या घोषणा देत शिवसैनिकांनी जल्लोष केला यावेळी जोरदार फटाके वाजवून पेढे भरून हा जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर रमाकांत मढवी, राम रेपाळे आदींसह इतर कार्यकर्त्यांनी या जल्लोषात सहभाग घेतला यावेळी हा आनंदोत्सव नाचून गाजून साजरा करण्यात आला. महिला आघाडीने देखील यावेळी फुगडी घालत जल्लोष केला. 

आज सत्याचा विजय झाला - खासदार श्रीकांत शिंदेमहाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेने पक्षात येत होते. तसेच आम्ही जो निर्णय घेतला, तो सर्वांना मान्य होता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लोक जोडली गेली असून आज जो केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल दिला. त्यावरून आज सत्याचा विजय झाला असल्याचे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. लोकशाही मार्गाने आपण लढलो, केंदीय निवडणूक आयोगानेकडे गेलो. त्यात आज आयोगाने निकाल दिला. या निकालामुळे शिवसैनिक आनंदित झाला आहे. शिवसेना वाढीसाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या आयुष्यातील बराच काळ खर्ची केला आहे. एकनाथ शिंदे यांनी तर, वयाच्या सोळाव्या वर्षांपासून पक्ष संघटना बांधणीसाठी काम करीत आहेत. आज हिंदुत्वाचा विजय, बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे