शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही रडू तरी कुणासाठी, आजी की आई-बाबांसाठी; कोरोनाने कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 23:52 IST

आटगावातील घटना : कोरोनाने एकाच घरातील तिघांचा मृत्यू, चिमुकल्यांचा आक्राेश

ठळक मुद्देशहापूर तालुक्यातील आटगाव गावातील हरिश्चंद्र किरपण (४५) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर लगेचच पडघा येथे एका रुग्णालयात नेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना आपल्या कवेत घेतल्याने अनेकांच्या घरावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कमावणारी व्यक्ती गेल्याने घर कसे चालणार, याची चिंता तर काही घरांतील दोन ते तीन व्यक्ती काही अंतराने गेल्याने घरात स्मशानशांतता पसरली आहे. आम्ही रडू तरी कुणासाठी, अशी चिमुकल्यांची  परिस्थिती झाली आहे.

शहापूर तालुक्यातील आटगाव गावातील हरिश्चंद्र किरपण (४५) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर लगेचच पडघा येथे एका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे उपचार केल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले व घरीच त्यांचा १९ एप्रिल रोजी मृत्यू झाला. इकडे त्याची आई सरस्वती (६५) यांनाही लागण झाल्यानंतर त्यांनाही सवाद येथे नेण्यात आले. मात्र त्यांनाही ऑक्सिजन न मिळाल्याने पुन्हा पडघे येथे आणण्यात आले. मात्र, त्यांचाही २३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू होतो न होतो तोच हरिश्चंद्र यांची पत्नी सीमा (३८) यांनाही कोरोनाची लागण झाल्यानंतर पडघा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच आपल्या सासू व पतीच्या दिवसांच्या दिवशीच मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना आटगाव येथे घडली. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथील आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यामुळे शहरात त्यांना दाखल होण्यासाठी यावे लागते. आधीच शहरात आरोग्य व्यवस्था कोलमडली असताना आमच्या माणसाला उपचार कसे मिळणार असा सवाल ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत. सरकारने ग्रामीण भागातील व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या