लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : नेवाळीतील जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची क्षणचित्रे यू टयूबवर अपलोड करण्यात आलेल्या नव्या आगरी लोकगीतात दिसून येत असल्याने त्याला भरपूर लाईक्स मिळत आहे. आगरी लोकगीतांचे नवतरुण गायक अमित फुलोरे यांनी ‘आम्ही भूिमपुत्र आमचा फायदा काय? आमच्याच सनावर बंदी काय?’ या आशयाचे गाणे गायले आहे. या गाण्याचा व्हिडीओ त्यांनी तयार केला आहे. त्यात नेवाळी आंदोलनाची क्षणचित्रे टाकण्यात आली आहेत. या आंदोलनातील जाळपोळ, महिलांचा बॅनर घेतलेला मोर्चा, पोलीस आयुक्तांची आंदोलनास्थळाची भेट आदींचा समावेश आहे. या गाण्यात भूमिपुत्रांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचण्यात आला असून देवीलाही साकडे घालण्यात आले आहे. अमित हे द्वारली गावात राहतात. नेवाळी विमानतळाच्या बाधित गावांपैकी द्वारली हेही एक गाव आहे.
आम्ही भूमिपुत्र, आमचा फायदा काय?
By admin | Updated: June 29, 2017 02:44 IST