शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

१४ महिन्यांत १२८ ठिकाणी फुटल्या जलवाहिन्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 23:13 IST

जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांत ३२ ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील विविध भागांत मेट्रो, रस्त्यांची डागडुजी तसेच नवीन रस्त्यांच्या बांधणीची कामे सुरू आहेत. या कामांदरम्यान रस्ते खोदले जात असल्याने जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १४ महिन्यांत १२८ ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली  आहे. 

जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत होता. त्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे ठाणे शहरातील मेट्रोच्या कामांसह रस्त्यांच्या नूतनीकरणासह डागडुजीची कामे थांबली होती.  कालांतराने लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा विविध संस्थांमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना सुरुवात झाली. त्यानुसार ठाणे शहरात मनपातर्फे रस्त्यांचे मजबुतीकरण करणे, काँक्रिटीकरणाची कामे तयार करणे आदी कामे मोठ्या प्रमाणात व वेगाने सुरू झाली आहेत.  मात्र, या कामांसाठी खोदण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये टाकलेल्या जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित ९६ जलवाहिन्या फुटल्याच्या घटना घडल्या आहे. यामध्ये सर्वाधिक २० जलवाहिन्या नोव्हेंबरमध्ये फुटल्याची नोंद आहे. त्या खालोखाल डिसेंबरमध्ये  १४ जलवाहिन्या फुटल्याची माहिती मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. 

nजानेवारी २०२१ ते मार्च २०२१ या तीन महिन्यांत ३२ ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. nयामध्ये जानेवारीत १०, फेब्रुवारीत १६, तर, मार्चमध्ये काही ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या असल्याची नोंद आहे. जलवाहिन्या फुटण्याच्या घटनांमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी