शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरांसाठी पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:48 IST

प्रशासनाला अपयश : उल्हास नदी परिसरात टँकरलॉबी सक्रिय, नागरिकांना टंचाईची झळ

बदलापूर : बदलापूरमध्ये पाणीटंचाईमुळे अनेक सोसायट्या या टँकरवरच अवलंबून आहेत. पिण्याच्या पाण्यावर टँकरलॉबी सक्रिय असतानाच आता बांधकाम व्यवसायाला पाणीपुरवठा करण्यातही टँकरलॉबी कमी पडलेली नाही. शहरातील अनेक टँकरचालक उल्हास नदीतून दिवसरात्र पाणी चोरून त्याची चढ्या दराने विक्री करत आहेत. उल्हास नदीतून होणारी पाणीचोरी रोखण्यात स्थानिक प्रशासन आणि लघुपाटबंधारे विभागाला अपयश आले आहे.

बदलापूर शहरात पाण्याचा व्यापार जास्तच तेजीत आला आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरही निर्बंध आणण्याची वेळ बदलापुरात आली आहे. बांधकामासाठी जो पाणीपुरवठा केला जात आहे, ते पाणी थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. उल्हास नदीवरील पाण्याचे आरक्षण हे प्रत्येक शहरासाठी निश्चित केले आहे. मात्र, असे असतानाही मोठ्या प्रमाणात पाणी नदीतून उचलण्यात येत आहे. शहरांना दिलेल्या पाण्याच्या आरक्षणापेक्षा जास्तीचे पाणी उचलल्यास त्या शहरांवर कारवाईचा आदेश पाटबंधारे विभागाने दिला आहे.

मात्र, शहरांसाठी उचलण्यात येणारे पाणी हे निश्चित प्रमाणातच उचलणे गरजेचे असताना शहरांत इतर ठिकाणी चोरून मोठ्या प्रमाणात पाणी उचलण्यात येत आहे. उल्हास नदीच्या पात्रातून रोज शंभरहून अधिक टँकर पाणी चोरून घेतात. त्यासाठी कुणाची परवानगीही घेतली जात नाही किंवा चोरणाऱ्यांना कुणाकडे पैसेही भरावे लागत नाही. जे काही आहे, ते पोलिसांना सोबत घेऊन सर्रासपणे सुरू आहे. पाण्याची चोरी ही पोलिसांसमोर होत असतानाही ते कोणतीच कारवाई करत नाहीत. तर, ज्या प्रशासनाकडे याची जबाबदारी आहे, तेही यासंदर्भात कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.

बदलापूर शहरातून वाहणाºया उल्हास नदीपात्रातून पाणीचोरी करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बदलापूर गावाकडील उल्हास नदीवरील पूल. या पुलाखालून नदीपात्रात जाणे शक्य असल्याने या पात्रातून दररोज पाण्याची चोरी केली जाते. या ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद करणे सहज शक्य असतानाही त्यासंदर्भात कोणतीच कारवाई केली जात नाही.एक ते दोन हजारांत टँकरची विक्री पाणीचोरांचा वाढत आहे दबदबापोलिसांना हाताशी धरून हा व्यवसाय सुरू असल्याने प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ही पाणीचोरी सुरू आहे. यावर निर्बंध घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे. उल्हास नदीतील पाणी थेट बांधकाम व्यावसायिकांना एक ते दोन हजारांत विकले जाते.उलट, टँकरमाफियांना स्वातंत्र्य देण्याचे कामच केले जात आहे. ठरलेल्या टँकरव्यतिरिक्त शहरातील दुसरा कोणताही टँकर या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आल्यावर त्याला रोखण्याचे काम केले जाते. यावरून, हे स्पष्ट होत आहे की, पाणी चोरणाºया टँकरमालकांचा दबदबा हा किती वाढला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका