शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

‘अतिधोकादायक’मधील ३० घरांचे पाणी तोडले, केडीएमसीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:23 AM

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा तातडीने खंडित करावा, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा पाणी व वीजपुरवठा तातडीने खंडित करावा, असे आदेश महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गुरुवारी ‘क’ व ‘फ’ प्रभागांतील अतिधोकादायक इमारतींमधील ३० सदनिकाधारकांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे.अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना घरे रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने दिली होती. तरीही, अनेक रहिवासी तेथेच राहत आहेत. त्यामुळे बोडके यांनी अतिधोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले होते. वीजपुरवठा खंडित करण्याची बाब ‘महावितरण’कडे असल्याने त्यांच्या अधिकाºयांना तसेच सूचित केले आहे. मात्र, ‘महावितरण’कडून कारवाईचा तपशील मिळू शकलेला नाही. तर, पाणीपुरवठा विभागाने ‘क’ प्रभागातील लक्ष्मी इमारतीमधील १७ जणांचा, ‘फ’ प्रभागातील अतिधोकादायक इमारतींमधील १३ जणांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना इमारत रिकामी करणे भाग पडले आहे.धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करावे. तसेच इमारत वास्तव्यास अनुकूल असल्याचा दाखला महापालिका अभियंत्यांकडून मिळवावा. त्यानंतरच, त्यात वास्तव्य करावे, अन्यथा धोकादायक व अतिधोकादायक इमारत दुर्घटनाग्रस्त झाल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशारा महापालिकेने दिला आहे.जीवितहानी होऊ नये, यासाठी महापालिका इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्यासाठी वीज व पाणी खंडित करत असली, तरी रहिवाशांना जायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे. महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था नाही. केवळ दोनच ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. तेथे ५० जणांनाही पावसाळ्यात राहता येणार नाही. महापालिकेने जादा संक्रमण शिबिरे उभारण्याचा विचार कधीही केलेला नाही. घर सोडले तर बाहेर भाडे परवडणारे नाही. इमारत रिकामी केल्यावर महापालिका तिच्यावर हातोडा चालवणार, अशी भीती रहिवाशांना सतावत आहे. दुसरीकडे बिल्डर, मालक आणि भाडेकरू यांच्यात एकमत नाही. अनेक इमारतींमध्ये भाडेकरू राहत नाहीत. काही इमारती या मालकांच्या ताब्यात आहेत. त्याचबरोबर धोकादायक इमारतींच्या अधिकृततेविषयीची सत्यता महापालिकेने यापूर्वी कधीही पडताळून पाहिलेली नाही.दीर्घकालीन उपाययोजनांची गरजधोकादायक व अतिधोकादायक इमारतींत राहणाºया रहिवाशांच्या उरात पाऊस आला की, धडकी भरते. कारण, त्यांच्या विरोधातील कारवाईस महापालिका पावसाळ्यात सक्रिय होते. महापालिकेस त्यांच्या जीवाची काळजी आहे. पण, त्यांच्या पुनर्विकासाची काळजी नाही.पावसाळा संपल्यावर उर्वरित आठ महिन्यांत या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला जात नाही. कोणताही प्रशासक त्याविषयी दीर्घकालीन उपाय व पर्याय शोधत नाही.तो कायमस्वरूपी शोधला तर महापालिकेस पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची वेळच येणार नाही, अशी अपेक्षा धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, तोपर्यंत जीव टांगणीलाच आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका