शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

टंचाईमुळे आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात

By admin | Updated: October 19, 2015 00:56 IST

पावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे.

सुरेश लोखंडे, ठाणेपावसाने प्रारंभापासून उपेक्षा केल्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी तसेच उल्हास खोऱ्यातील आंध्रा धरणात कमी पाणी साठा आहे. या धरणातील पाणी पिण्यासह उद्योगाना १५ जुलैपर्यंत पुरवणे शक्य व्हावे, यासाठी दसऱ्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील पाच महापालिका, दोन नगरपालिका आणि जि.प.च्या ४२ गावपाड्यांना आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सक्तीची होणार आहे.जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत ४२१४.६७ मिमी पाऊस कमी पडला आहे. आंध्रा धरणात ५०.०६ टक्के पाणी साठा असून तेथे ६४४ मिमी. पाऊस कमी पडला . बारवी धरणात ८९.१९ टक्के साठा असून पाऊस १००५ मिमी कमी झाला. त्यामुळे यावर्षी जादा पाणी कपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार. गेल्या वर्षी सुमारे ४८.६६ दशलक्ष घनमीटर पाण्याची कमी भरून काढण्यासाठी १४ टक्के कपात झाली होती. सध्या बारवीत १६०.५६ तर आंध्रात १६९.७० दशलक्ष घन मीटर पाणी साठा आहे. त्यातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या पाच महापालिकां, अंबरनाथ व कुळगाव-बदलापूर नगरपालिका, एमआयडीसी आणि भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४२ गावाना या उल्हास नदी व बारवी धरणातून शहरांसह औद्योगाना वर्षभर ३५०.१६ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा होणार. सुमारे एक हजार ३६५ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी दररोज पुरवावे लागणार आहे. दोन दिवसाच्या पाणी कपातीतून ते शक्य होणार आहे.>सध्या मोहने बंधारा ओव्हर फ्लो झाल्यामुळे त्याचा वापर दैनंदिन कामांसाठी होत असून उर्वरित पाणी खाडीत वाहून जात आहे. ते पाणी लवकरच कमी पडणार आहे. त्या आधी दोन दिवसांच्या कपातीचा निर्णय लागू होणार असल्याचे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय निकुडे यांनी सांगितले. >बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा एमआयडीसी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व आंध्राचे पाणी उल्हास नदीतून स्टेमघर प्राधिकरणाद्वारे केला जातो. कपातीच्या धोरणामुळे त्यांना आठवड्यातून दोन दिवसांचे पाणी उचलण्यास मनाई केली जाणार आहे.