शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांमुळे केडीएमसीमध्ये पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:37 IST

केडीएमसीची महासभा : विरोधक, सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर हल्लाबोल

कल्याण: बेकायदा बांधकामधारक केडीएमसी हद्दीतील करदात्यांचे पाणी पळवत आहेत. त्यामुळे पाणीटंचाई भेडसावत आहे, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष मनसेने शुक्रवारी महासभेत केला. यावेळी पाणीप्रश्नावरून विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनीही प्रशासनावर हल्लाबोल केला. अखेर, पाणीप्रश्नावर सोमवारी बैठक होणार आहे, असे महापौर विनीता राणे यांनी स्पष्ट केले.

शहरातील बेकायदा बांधकामप्रकरणी निलंबित असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सु.रा. पवार व प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे. बेकायदा बांधकामे तोडली जात नाहीत. अधिकाºयांवर कारवाई नाही. बेकायदा बांधकामे करदात्यांच्या तोंडचे पाणी पळवत असल्याने महापालिका हद्दीत पाणीटंचाई आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला.

बेकायदा चाळीतील एका घराला महिन्याला १०० रुपये आकारून पाणी पुरवले जाते, असे सत्ताधारी नगरसेविका माधुरी काळे यांनी सांगितले. पूर्वेतील पाणीसमस्या सुटलेली नाही. पश्चिमेतील शिवसेनेचे नगरसेवक जयवंत भोईर, हर्षला थवील, छाया वाघमारे यांनीही आपल्या प्रभागात पाणी येत नाही. त्यावर प्रशासन तोडगा काढत नाही, याकडे लक्ष वेधले. माझ्या प्रभागात पाण्याच्या दोन टाक्या आहेत. मात्र, त्यात पाणीच नाही, असे भोईर म्हणाले. पिसवली येथील नगरसेविका सुनीता खंडागळे यांनीही पाण्याचा प्रश्न बिकट असल्याचे सांगितले.

नगरसेवक वामन म्हात्रे म्हणाले, कल्याण पूर्व व अन्य ठिकाणी २५ हजारांपेक्षा जास्त बेकायदा नळजोडण्यांद्वारे पाणीचोरी होत आहे. त्यामुळे करदात्यांना पाणी मिळत नाही. तर, शिवसेना नगरसेविका शालिनी वायले म्हणाल्या, पाण्यासंदर्भात बुधवारी बैठक होऊन काहीच उपयोग झाला नाही. आजही प्रभागात पाणी आलेले नाही. भाजपा नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी मागील वर्षी २७ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाच कोटींची कामे करण्यात आली. तरीही, समस्या कायम आहे. पाणीटंचाई असताना आता २२ टक्के कपात लागू झाली आहे. त्यामुळे टंचाईची समस्या अधिक तीव्र होणार आहे.सदस्य बैठकीला गैरहजर, महापौरांचा चढला पारापाणीप्रश्नावर बुधवारी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीला प्रत्येक नगरसेवकाने उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र, तेथे अनेकांनी पाठ फिरवली. सभेत पटलावर विषय नसताना हा विषय घेतला जातो. सगळ्यांनी शांत बसा, या प्रश्नावर पुन्हा बैठक घेऊ. काळे या बैठकीला आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी तर सभागृहाचा वेळ अजिबात घेऊ नये. त्यावर आयुक्तांनी खुलासा करावा. तसेच पाणीप्रश्नावर पुन्हा सोमवारी बैठक घेतली जाईल, असे राणे यांनी स्पष्ट केले.अधिकाऱयांची भरती करामहापालिकेत अधिकाऱयांची कमतरता आहे. काही जण निवृत्त झाले आहेत. काही निवृत्तीच्या मार्गावर आहे. तर, काही अधिकारी काम करत नाही. त्यामुळे अधिकाऱयांची भरती झाली पाहिजे. तरच, समस्यावर तोडगा काढणे शक्य होईल, अशी सूचना शिवसेना सदस्य रमेश म्हात्रे यांनी केली.पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाययोजनापाटबंधारे खात्याकडून २२ टक्के पाणीकपात लागू झाली आहे. कल्याण पूर्वेतील पाणीप्रश्नावर बुधवारी बैठक घेतली. तसेच ‘महावितरण’च्या अधिकाºयांशी शुक्रवारी बैठक घेतली. मोहने व मोहिली येथील नदीपात्रातील पाण्याची पातळी कशी राखली जाईल, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असा खुलासा आयुक्त गोविंद बोडके यांनी केला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका