शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी बाणी...! प्रवाशांच्या घशाला कोरड तर खिशाला कात्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2023 18:49 IST

लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वांचीच तुफान गर्दी रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळत आहे.

शाम धुमाळ

कसारा : दिवाळीमुळे असलेली प्रवाशांची तुफान गर्दी यात रेल्वे स्थानकावर पाणी बॉटल मिळत नसल्याने प्रवाशांच्या घशाला कोरड पडलेली असताना प्रवाशांना पाणी बॉटल ऐवजी थंड पेय घेण्यास भाग पडत असल्याने सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. मद्य रेल्वेच्याठाणे रेल्वे स्थानकावर मुबंई उपनगरासह बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते दरम्यान सध्या दिवाळी सुठ्या मुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील 1 ते 10 रेल्वे स्थानक प्रवाशाच्या गर्दीमुळे फुलून गेले होते. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यत सर्वांचीच तुफान गर्दी रेल्वे स्थानकावर पाहावयास मिळत आहे.

रेल्वे स्थानकावरील गर्दीचा सर्वाधिक फायदा हा रेल्वे कॅन्टीनला होत आहे. गरमीने वैतागलेले तहानेने व्याकुळ झालेले हजारो प्रवासी, ठाणे रेल्वे स्थानकावर फ्लॅटफॉर्मवरील रेल्वे कँटीन वर पाणी बॉटल साथीफेऱ्या मारत होते. ठाणे रेल्वे स्थानकावर एकही रेल्वे कॅन्टीन वर पाणी बॉटल प्रवाशांना उपलब्ध होत नसल्याने प्रवासी पुरते वैतागलेले होते. रेल्वे कॅन्टीनवर असलेल्या वेंडर लोकांकडून प्रवाशांना उलट उत्तरे मिळत होती 'पाणी बॉटल नही हे आप कोल्ड्रिंग्स लिजिए' अशी संतापजनक उत्तरे प्रवाशांना मिळत होती. मात्र कॅन्टीनवर विक्रीसाठी असलेले थंड पेय हे एखाद्या लोकल कंपनीचे असल्याने व तेही कमी थंड असल्याने प्रवासी थंड पेय घेण्यास काही प्रवासी टाळाटाळ करीत होते.तर काही प्रवासी नाईलाजास्तव घेत होते.परंतु अप्रमाणित असलेले थंड पेय पिणे हे जरी घातक असले तरी तहानेने व्याकुळ झालेले प्रवासी आपली तहान भागविण्यासाठी थंड पेय विकत घेत होते.

परंतु एका वेळी तेही सर्वच कॅन्टीन ला पानी बॉटल  मिळत नसल्याने  प्रवासी नाराजी व्यक्त करीत असून विक्री कंपनी,रेल्वे प्रशासन व रेल्वे कॅन्टीन चे ठेकेदार यांच्या  सगनमताने रेल्वे स्थानकावरिल् कॅन्टीन वर  पाणी बॉटल साठी प्रवाशा ना वेठीस धरले जात असल्याने.रेल्वे प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे.. पाणी नसल्याने अनेकांना आली चक्कर.दरम्यान धावपळ करीत गाडी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना रेल्वे फलाटावरील कॅन्टीन वर पिण्याचे पाणीच उपलब्ध न झाल्याने अनेक महिला वृद्धांना उन्हाचा त्रास होऊन चक्कर आली. रेल्वे कॅन्टीन कर्मचारीही उद्धट... दरम्यान रेल्वे स्थानकावरील फ्लॅट फॉर्म  कॅन्टीन वर पाणी उपलब्ध नसल्याने कॅन्टीन मधील कर्मचाऱ्यांना विचारणा केली की ते कर्मचारी प्रवाशा ना समाधा कारक उत्तरे देत नाहीत उलट उतरे देऊन प्रवाशा ना मूर्ख ठरवण्याचे काम कर्मचारी करीत होते.

टॅग्स :thaneठाणेrailwayरेल्वे