शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांवर पाणी टंचाईचे ढग, बुधवारपासून ३६तास शट डाऊन

By अजित मांडके | Updated: December 12, 2022 18:20 IST

दुसरीकडे पाणी पुरवठा बंद असलेल्या भागात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून विभागवार करण्यात आलेल्या या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

ठाणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरु स्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. या कामांमुळे बुधवारपासून पुढील ३६ तासांसाठी स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणोकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 

दुसरीकडे पाणी पुरवठा बंद असलेल्या भागात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून विभागवार करण्यात आलेल्या या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

स्टेम प्राधिकरणाच्या योजनेतील दैनंदिन देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बुधवारी सकाळी ९ ते गुरूवार रात्नी ९ असा ३६ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे स्टेमकडून ठाणो महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे ठाणोकरांचे हाल होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणो महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या कालावधीत स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरु  ठेवून त्याचे विभागवार नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

नव्या नियोजनानुसार बुधवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वे‌ळेत घोडबंदर रोड, माजिवडा-मानपाडा, ब्रह्मांड, विजयनगरी, पातलीपाडा, साकेतचे नवीन कनेक्शन या भागातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे. बुधवार रात्री ९ ते गुरूवार सकाळी ९ वाजेपर्यंत गांधीनगर, सुरकुरपाडा, उन्नती, सिद्धांचल, समतानगर, सिध्देश्वर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरूवार सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, मुंब्रा व कळव्याचा काही भाग, खारेगाव, रुस्तमजी, साकेत, जेल, ऋतूपार्क या भागात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. 

टॅग्स :thaneठाणेwater shortageपाणीकपात