शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर तालुक्यातील गाव-पाड्यांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:45 IST

जानेवारीतच गंभीर परिस्थिती; तहसीलदारांकडे टँकर मागणीचे प्रस्ताव सादर

भातसानगर : शहापूर तालुक्यातील चार गावे आणि आठ पाड्यांत आतापासूनच पाणीटंचाई भेडसावते आहे. या गाव पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यापासूनच पावसाने दिलेल्या गुंगाºयाचे पडसाद सध्या तालुक्यात जाणवत आहेत.मार्च ते एप्रिल महिन्यात तालुक्यातील गावांना पाणीटंचाई जाणवत असे. यंदा मात्र, काही दिवसांपासूनच दांड,अजनुप, वाशाळा(बु), वाशाळा(खु), या चार गावांच्या बरोबर पारधवाडी, नारळवाडी, नवीनवाडी, कोळीपाडा, वरचा गायदरा, सखाराम पाडा, राईची वाडी, चारण वाडी, या गावांमध्ये काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. या गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी त्या-त्या ग्रामपंचायतीने गट विकास अधिकाºयांकडे लेखी मागणी केली आहे.ही मागणी लक्षात घेत गट विकास अधिकारी टी.ओ. चव्हाण यांनी हे प्रस्ताव तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांच्याकडे पाठवल्याची माहिती दिली आहे. या गावपाड्यांना तीन टँकरची गरज असल्याने आता त्यासाठीची तरतूद केव्हा होते या प्रतीक्षेत नागरिक आहेत. या वर्षी तालुक्यात गेल्यावर्षीपेक्षा अधिक भीषण पाणी टंचाई निर्माण होणार असल्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी तालुक्यात ११२ गाव पाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवली होती. यंदा मात्र हा आकडा वाढणार आहे.तानसा वैतरणा परिसरातील गावांना भातसा नदीतूनच पाणी मिळणार की, तानसा वैतरणा नदीतून या बाबत अजूनही काहीच माहिती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. तानसा, वैतरणा या परिसरातील गावांना या धरणातून पाणी भरून दिल्यास त्यासाठीचे ३० किमी. अंतर वाचून गावांना लवकर आणि सुरळीत पाणीपुरवठा केला जाऊ शकेल, असे अनेकांचे म्हणणे आहे.शहापूर तालुक्यातील तीन गावे आणि आठ पाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्या गावातील ग्रामपंचायतींनी टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार त्या गाव पाड्यांना पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे.- रवींद्र बाविस्कर,तहसीलदार, शहापूर

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई