शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सात सोसायट्यांमधील पाणी मीटर गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 03:19 IST

सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे.

डोंबिवली : सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये मीटरचोरीची संख्या ३०० च्या आसपास पोहोचली आहे. शिवमंदिर पथ, श्रीखंडेवाडी आदी परिसरातील सात सोसायट्यांमधील मीटर आता चोरीला गेली आहेत. विविध पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत एफआयआर दाखल होऊनही चोरट्यांचा छडा लागलेला नाही. एकीकडे पोलिसांची उदासीनता दिसत असताना दुसरीकडे मात्र तक्रारदार असलेल्या सोसायटींमधील रहिवाशांची परवड होत आहे.काही महिन्यांपूर्वी डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ येथील सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले होते. पश्चिमेतील काही भागांमध्येही या चोरीच्या घटना घडल्या होत्या. एप्रिलपर्यंत २५३ मीटर चोरीला गेली होती. आजही या चोरीचे सत्र सुरूच असल्याने ही संख्या आता ३०० च्या आसपास पोहोचली आहे. मागील काही दिवसांमध्ये पूर्वेकडील श्रीखंडेवाडी, रघुवीरनगर, शिवमंदिर पथ, संगीतावाडी या भागांमधील सात सोसायट्यांमधील पाणीमीटर चोरीला गेली आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत. मीटर चोरीमुळे सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. तर, मीटर चोरीला जात असल्याने पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे. नवीन मीटर लावण्यासाठी सोसायट्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.दरम्यान, वाढत्या चोरीच्या घटना पाहता संगीतावाडी, रघुवीरनगर रहिवाशी संघातर्फे स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे. शहरात मीटर चोरीच्या घटना सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्यापपर्यंत त्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.>मीटरची चोरी भंगार विक्रीसाठीचोरलेले मीटर अन्यत्र वापरता येत नाही. मीटर पितळ धातूचे आहे. पितळ्याला चांगला भाव मिळत असल्याने चोरटे त्याची भंगारामध्ये विक्री करत असावेत, असा कयास मांडला जात आहे. यामागे मोठी टोळी सक्रीय असल्याची शंकाही उपस्थित केली जात आहे.>चोरांचा छडा लागणे गरजेचेमीटर चोरीच्याघटनांमध्ये रहिवाशांची मोठ्या प्रमाणावर परवड होत आहे. मीटर चोरून नेली जात असल्याने पाणीपुरवठाही खंडित होतो. पाणीपुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो. रघुवीरनगर, संगीतावाडी प्रभागामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यांची नोंद होत असताना चोरांचा छडा लागणे गरजेचे आहे, असे मत रहिवासी सागर घोणे आणि सौरभ नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.